मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीने बजावला समन्स, उद्या चौकशीला बोलावले

BREAKING : अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीने बजावला समन्स, उद्या चौकशीला बोलावले

 अनिल देशमुखांसोबत इतरही आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली

अनिल देशमुखांसोबत इतरही आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली

मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहे. आज त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता...

मुंबई, 04 नोव्हेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांनी ईडीने (ed) अटक केली असून कोठडी सुनावली आहे. आज त्यांनी चौकशी झाली आहे. तर त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh)  यांना ईडीने समन्स बजावला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहे. आज त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता ईडीने ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स बजावला आहे. उद्या शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. अनिल देशमुख आणि ऋषिकेश यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.

याआधीही ईडीने ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावला होता. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यात परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारता येत नाही.

दिवाळीनिमित्त घराघरांमध्ये आनंद, या 9 कुटुंबातील कर्त्या पुरुषानेच सोडली साथ

एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा, असाही संशय ईडीने व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Anil deshmukh