• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • दिवाळीनिमित्त घराघरांमध्ये आनंद-उत्साह, मात्र या 9 कुटुंबातील कर्त्या पुरुषानेच सोडली साथ

दिवाळीनिमित्त घराघरांमध्ये आनंद-उत्साह, मात्र या 9 कुटुंबातील कर्त्या पुरुषानेच सोडली साथ

आज लक्ष्मीपूजनानिमित्त देश दिव्यांनी उजळून निघाला आहे. मात्र या घरातील कर्त्या पुरुषाने कुटुंबाची साथ सोडली.

 • Share this:
  बिहार, 4 नोव्हेंबर : बिहारमधील (Bihar Crime News) गोपाळगंजमध्ये विषारी दारू प्यायलामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या प्रकरणात डीएम (DM) डॉक्टर नवल किशोर चौधरींनी सांगितलं की, आतापर्यंत गोपाळगंजमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेहांवर पोस्टमार्टम सुरू आहे. (bihar news 9 people die in Bihar due to Alcohol) तीन ठिकाणी केलेल्या छापेमारीत आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या लोकांच्या घरातून देशी दारूचे पाऊच सापडले होते. डीएननी सांगितलं की, आपात्कालीन व्यवस्थेसाठी मेडिकल टीम तयार ठेवण्यात आली आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू काही जणांनी सांगितलं की, दारू कांडात मृतांची संख्या 10 पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय सात जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. हे ही वाचा-मुझे पहचानता नही क्या' विचारणाऱ्या कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून हत्या या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन बिहारमधील मंत्री जनक राम यांनी दिलं आहे. विकासाविरोधात काही जणांकडून अशा प्रकारचं कृत्य केलं जात आहे. बिहार सरकारची बदनामी करण्याचा कट रचला जात आहे. या प्रकरणात उच्चस्तरीय तपास होईल असं सांगितलं जात आहे. दारूबंदी असतानाही दारू प्यायल्याने झाला मृत्यू बिहारमध्ये 5 एप्रिल 2016 रोजी दारूबंदी लागू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत 123 लोकांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. तर गेल्या 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: