मुंबई, 29 जून: 100 कोटी वसुली प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. ईडीने (ED) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्यामुळे अनिल देशमुख यांची धावाधाव सुरू झाली आहे. त्यांनी ईडीला पत्र पाठवून विनंतीच केली आहे. ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना आज चौकशीला हजर राहावे लागणार होते. परंतु, अनिल देशमुख यांनी वकिलांचा सल्ला घेऊन पुढील पाऊल टाकले आहे. त्यांनी ईडीला विनंती करणारे एक पत्र पाठवले आहे. ‘ईडीने यापूर्वी जी माहिती हवी त्यास सहकार्य केले, माझ्या कुंटुब सदस्य ही मदत करत आहेत. त्यामुळे ईडी यंत्रणेने माझ्या विनंतीचा विचार करावा’ अशी विनंतीच अनिल देशमुख यांनी केली. Twitter नं हटवला भारताचा चुकीचा नकाशा, जम्मू-काश्मीर आणि लडाख दाखवलेला वेगळा देश कोविड काळात सोशल डिस्टसिंग आणि इतर परिस्थितीत आणि त्यात वय 72 असल्यामुळे स्वत: ईडी कार्यालय उपस्थितीत न राहण्यासाठी विनंती देशमुखांनी या पत्रातून केली आहे. आज सकाळपासून अनिल देशमुख यांच्या शासकीय निवास्थान ज्ञानेश्वरी बंगल्यावर हालचालींना वेग आला होता. वकिलांची टीम सकाळीच घरी आली होती. अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर वकील टीम घरातून निघाली. पण ईडी कार्यालय दिशेन मात्र ही टीम गेलेली नाही. याआधीही देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
काय आहे ‘द स्लीपिंग लेडी’ या पर्वतामागचं रहस्य? पाहा PHOTO
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख आज कोर्टात जाणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. पण अनिल देशमुख इडी चौकशीला हजर राहणार की नाही या बाबतत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप केला. याप्रकरणी बार मालकांनी दिलेला जबाब तसेच सचिन वाझे याच्या जबाबानंतर ईडीने अनिल देशमुखांच्या निकटवर्थींना अटक केली आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. दोघांनाही 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.