मुंबई, 7 नोव्हेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आता आणखी एक झटका बसला आहे. काल सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निर्णयाला ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची पुन्हा ईडी कोठडीत रवानगी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांची अद्याप चौकशी करायची असल्याने ईडी कोठडी मिळावी अशी मागणी करत ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने केलेल्या या मागणीवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
Bombay High Court remands Maharashtra's former home minister Anil Deshmukh to Enforcement Directorate custody till 12th November
— ANI (@ANI) November 7, 2021
He was arrested on Nov 1 in a money laundering case.
(file photo) pic.twitter.com/B1XD1BrqfA
काल अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर शनिवारी (6 नोव्हेंबर 2021) पुन्हा कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वाचा : अनिल देशमुखांची दिवाळी कारागृहातच 100 कोटी वसुलीप्रकरणी (Money laundering case) आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली. यापूर्वी अनिल देशमुख यांच्या दोन्ही PAना ईडीकडून अटक यापूर्वीच अनिल देशमुख यांच्या दोन्ही पीएला ईडीने अटक केली आहे. ईडीनं ही कारवाई केली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे (Kundan Shinde and Sanjeev Palande) अशी दोन्ही पीएची नावं आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.