• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED ने केली अटक

BREAKING : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED ने केली अटक

गेल्या 13 तासांपासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर मध्यरात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

गेल्या 13 तासांपासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर मध्यरात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

गेल्या 13 तासांपासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर मध्यरात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

 • Share this:
  मुंबई, 02 नोव्हेंबर : 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री (Former Home Minister)  अनिल देशमुख (Anil Deshmukh arrest)  यांना ईडीने अटक केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून याचे पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणी (Money laundering case) आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 4 ते 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. गेल्या 13 तासांपासून त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीनंतर मध्यरात्री उशिरा अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. सायंकाळी ७.३० वाजता ईडीचे वरीष्ट आधिकारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. ते थेट ईडी कार्यालयात गेले. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चौकशी केली आणि अखेर १३ तासांनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. दरम्यान, अनिल देशमुख यांना अटक झाली आहे. आता पुढचा नंबर हा अनिल परब यांचा असणार आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून १०० कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.
  Published by:sachin Salve
  First published: