Andheri bridge collapse: प्रवाशांना असाही दिलासा... इंडिगोने देऊ केली मोफत सेवा

Andheri bridge collapse: प्रवाशांना असाही दिलासा... इंडिगोने देऊ केली मोफत सेवा

एकीकडे पडणारा मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे अंधेरीच्या पुलाचा काही भाग पडल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.

  • Share this:

मुंबई ०३ जुलै: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. ऑफिसला जाण्याच्या वेळेत पश्चिम रेल्वे खोळंबल्याने अनेक चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अनेकांनी रस्त्याने प्रवास करण्याचा मार्ग स्वीकारला. एकीकडे पडणारा मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे अंधेरीच्या पुलाचा काही भाग पडल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. या सगळ्या गदारोळात काहींना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यांचे विमान सुटले. पण ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून इंडिगोने त्यांच्या प्रवाशांना नंतरच्या विमानाने इच्छितस्थळी पोहोचवण्याची जबाबदारी उचलली आहे. विशेष म्हणजे सर्व प्रवाशांचा हा प्रवास इंडिगो मोफत करणार आहे.

https://twitter.com/IndiGo6E/status/1014021348920778754

दरम्यान, सकाळी ७.३० च्या सुमारास हा पूल कोसळला. आतापर्यंत कोणतीही जीवीतहानी झालेली नसून पाच जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल आणि बीएमसी कमिशनर अजॉय मेहतांशी फोनवरून बातचीत करत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेची वाहतुकही विस्कळीत झाली आहे. रेल्वे सेवा कोलमडल्यामुळे बेस्टच्या अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे सेवा कोलमंडल्यामुळे डबेवाले जागोजागी अडकून पडले. त्यामुळे आजच्या दिवशी डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात आली.

हेही वाचा: पूल कोसळून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत, जाणून घ्या या महत्त्वाच्या १० गोष्टी

पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 01:12 PM IST

ताज्या बातम्या