• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Amravati Violence: "समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार" - दिलीप वळसे पाटील

Amravati Violence: "समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार" - दिलीप वळसे पाटील

Dilip walse Patil on Amravati violence: अमरावती बंदला हिंसक वळण लागलं. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पायील यांनी प्रतिक्रिया देत दोषींवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर : त्रिपुरातील (Tripura) घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात शुक्रवारी मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांना अनेक ठिकाणी हिंसक वळण (Violence) लागलं. त्यानंतर आज अमरावतीमध्ये भाजपच्या वतीने आज बंदची (Amravati Bandh) हाक देण्यात आली होती. अमरावती बंदला सुद्धा हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे. अमरावतीत जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी प्रतिक्रिया देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाने आज अमरावती बंदची हाक दिली होती. हा बंद शांततेत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने त्यात अप्रिय घटना घडल्या आहेत. मालमत्तेचं नुकसान झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हटलं, विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यंसोबत सुद्धा चर्चा केली आहे. त्यांनाही विनंती केली आहे की, आपलं राज्य महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने शांतता राहील यासाठी सहकार्य करा. अमरावतीत शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करा. वाचा : अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, गृहमंत्र्यांचं राज्यातील जनतेला आवाहन आज राज्यातील सर्व भागांत शांतता आहे. अमरावतीत एक घटना घडली आहे आणि तेथील परिस्थितीत लवकरच नियंत्रणात येईल. समाजात द्वेष निर्माण करणारं किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. आंदोलनास कोणालाही परवानगी नव्हती, फक्त निवेदन देण्यास आणि स्वीकारण्यास परवानगी होती. सोशल मीडियातून सुद्धा अफवा पसरवू नये, सोशल मीडियावर चुकची माहीती पसरवू नये. सर्व नागरिकांनी शांतता राखा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांनी शांतता राखण्यासाठी मदत करावी असं आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. अमरावतीत बंदला हिंसक वळण, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आजा अमरावती बंदची (Amravati bandh) हाक देण्यात आली होती. अमरावती शहर बंदला हिंसक वळण (violence during Amravati bandh) लागल्याचं पहायला मिळालं. जमावाकडून दुकानांवर दगडफेक (stone pelting) आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला गालबोट लागलं होतं. या मोर्चाला हिंसक वळण आलं तर गाड्या व 20 ते 25 दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून आज अमरावती शहर बंदचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले होते. याच बंद दरम्यान आज हिंसाचार झाल्याचं पहायला मिळत आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: