जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / VIDEO अमित ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होताच आई शर्मिला आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी

VIDEO अमित ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होताच आई शर्मिला आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी

VIDEO अमित ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होताच आई शर्मिला आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी

अमित यांच्या नावाची घोषणा होत असताना खाली कार्यकर्त्यांमध्ये अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे, आजी, बहिण उर्वशी आणि पत्नी मिताली या बसलेल्या होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 23 जानेवारी : ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा आज राजकारणात औपचारिक प्रवेश झाला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये सर्व ठाकरे कुटुंबीय उपस्थित होतं. अमित यांच्या रुपाने आणखी एका नव्या दमाच्या ‘ठाकरें’चा राजकारण प्रवेश झाला आहे. गेली काही वर्ष अमित हे पक्षात सक्रिय होते. काही आंदोलनातही ते सहभागी होते. मात्र त्यांच्यावर औपचारिक जबाबदारी देण्यात आली नव्हती. या आधी गेली काही वर्ष आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय आहेत आणि सध्या ते राज्याचे पर्यटनमंत्रीही आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणुक न लढविण्याची आणि कुठलंही सरकारी पद न घेण्याची भूमिका घेतली होती. नंतर मात्र राज आणि उद्धव ठाकरे यांनी नव्या पद्धतीने राजकारण केलं आणि आता ठाकरे घराण्याचा नवा सदस्य आपलं भविष्य आजमविणार आहे. गेले काही दिवस अमित यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू होती. अधिवेशनाच्या पहिल्या भागात माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरेंची नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडला आणि त्याला सगळ्यांनी एका आवाजात पाठिंबा दिला. अजित पवारांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेले रोहित पवार, असा होता प्रतिसाद अमित यांच्या नावाची घोषणा होत असताना खाली कार्यकर्त्यांमध्ये अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे, आजी, बहिण उर्वशी आणि पत्नी मिताली या बसलेल्या होत्या. अमित यांच्या नावाची घोषणा झाली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी अमित यांच्या आई, आजी आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

जाहिरात

अमितचं जेव्हा नाव ऐकलं तेव्हा अंगावर काटा उभा राहिला अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली. तो लोकांसाठी काम करेल असंही त्या म्हणाल्या. मनसेच्या नेतेपदी घोषणा झाल्यानंतर अमित यांनी पक्षाच्या वतीने शिक्षण विषयक ठराव मांडला. दप्तराचं ओझं कमी करणं, स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांना ऑनलाईन अभ्यास साहित्य निर्माण करणं अशा अनेक सूचना त्यांनी केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात