• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Shocking! फिट राहण्यासाठी घेतलं औषध; प्रसिद्ध खेळाडूचा जबडाच गळून पडला

Shocking! फिट राहण्यासाठी घेतलं औषध; प्रसिद्ध खेळाडूचा जबडाच गळून पडला

या खेळाडूने औषधाच्या तब्बल 1400 बाटल्या फस्त केल्या.

  • Share this:
वॉशिंग्टन, 24 सप्टेंबर : प्रत्येक खेळाडूसाठी फिटनेस (Fitness) महत्त्वाचा असतो. सर्वच खेळाडू फिटनेसवर अपार मेहनत घेत असतात.  खेळादरम्यान अनेक वेळा खेळाडू जखमी होऊ शकतात. मात्र खेळाडूने स्वतःच स्वतःचं नुकसान करून घेतलं तर त्याची भरपाई करणं कठीण असतं. अशीच किंमत मोजावी लागली ती अमेरिकेतील अॅथलेट एबेन बायर्सला (Eben Byers) . अमेरिकेतल्या (United States) अत्यंत श्रीमंत घरात जन्मलेल्या एबेन (Eben)  एक उत्तम खेळाडू होता. पण फिट राहण्याच्या नादात त्याने असं औषध घेतलं ज्यामुले त्याचा अर्धा चेहरा (face) अक्षरशः गळून पडला (Jaw fell after he drank medicine) आणि त्यानंतर यामुळे त्याला आपला जीवही गमवावा लागला. 1880 मध्ये जन्मलेल्या एबेनने 1900 च्या दशकात अनेक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकं जिंकली. 1927 मध्ये खेळादरम्यान जखमी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला रेडिटॉर (radiator) हे औषध (medicine) लिहून दिलं. या औषधामुळे ऊर्जा मिळून एबेन लवकर बरा झाला. हे औषध त्याला इतकं आवडलं, की बरं झाल्यानंतरही एबेनने त्याचं सेवन सुरू ठेवलं. एबेनने या औषधाच्या तब्बल 1400 बाटल्या एकेक करत रिचवल्या; मात्र त्यानंतर जे झालं त्याने तो फार हादरून गेला. औषधाच्या अतिसेवनामुळे त्याचा अर्धा जबडा अक्षरशः खाली पडला. त्याची हाडंही आतून पोकळ झाली. परिणामी वयाच्या 51 व्या वर्षी त्याचं निधन झालं. हे वाचा - Appendix चं ऑपरेशन करायला गेली आणि पोटातून निघालं चक्क बाळ; महिलाही झाली शॉक एबेनच्या मृत्यूनंतर कसून तपास करण्यात आला. रेडिटॉरच्या वापरामुळे त्याची दुखापत लवकर बरी होऊ शकली असती. यामुळे त्याला दररोज एक छोटा चमचा औषध पिण्याचा सल्ला देण्यात आला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं; मात्र एबेनला औषध खूप आवडायला लागलं. कारण या औषधामुळे त्याला खूप चैतन्य आल्यासारखं वाटू लागलं. यामुळे त्याने दररोज रेडिटॉरची एक बाटली पिण्यास सुरुवात केली. एका वर्षात त्याला या औषधाचं इतकं व्यसन लागलं, की तो एका दिवसात तीन बाटल्या पिऊ लागला; मात्र औषधाचा दुष्पपरिणाम होऊन 1931 मध्ये अचानक त्याचा जबडा खाली पडला. एबेनचा जबडा खाली पडला तेव्हा त्याला काहीच वेदना जाणवली नाही. खरं तर, रेडिटॉर प्याल्यामुळे त्याच्या संवेदना बधिर झाल्या होत्या. डॉक्टरांनी त्याचा जबडा जोडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. 1932मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचं शरीर डॉक्टरांनी जतन केलं. त्यानंतर 1965मध्ये त्याचा मृतदेह काढून त्याची चाचणी घेण्यात आली. इतक्या वर्षांनंतरही त्याच्या मृत शरीरात किरणोत्सर्गाचे कण सापडले. हे वाचा - निम्मं धड गायब, पण अवघ्या 4.78 सेकंदात अचानक बदललं या तरुणाचं आयुष्य; पाहा Video एबेनच्या मृत्यूविषयी सर्वांत मोठं सत्य समोर आलं, ते म्हणजे ज्या डॉक्टरने एबेनला हे औषध लिहून दिलं होतं, ते प्रत्यक्षात डॉक्टर नव्हते. त्याने खोटी पदवी धारण करून अनेक जणांना फसवलं होतं. त्याने अनेकांना रेडिटॉर हे औषध असल्याचं सांगून त्याचं सेवन करायला लावलं. त्यामुळे अनेकांचे प्राण संकटात सापडले.
First published: