• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याभेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  पुणे, 11 जून: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली आहे. प्रशांत यांनी शरद पवार यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन भेट (Prashant Kishor's Meeting With Sharad Pawar)घेतली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याभेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी स्वतः सांगितलं मी यापुढं रणनीतीकार म्हणून काम करणार नाही आहे. तसंच शरद पवार वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटत असतात. पुढे अजित पवार म्हणाले की, आता प्रशांत किशोर यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामं असतील. पण त्यांनी राजकारणाचं क्षेत्र आता सोडलं आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही. केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार असं नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा- ''... वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा'', संजय राऊतांचं भाजपला चॅलेन्ज तब्बल तीन तास भेट शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तब्बल तीन तास भेट झाली. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होत आहे याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. बंगालमध्ये प्रशांत किशोर यांचा ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या विजयात मोठा वाटा आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर राजकीय रणनितीकार राहणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली होती. मात्र, भाजपला याठिकाणी तीन अंकी आकडाही गाठता आला नाही. ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये बहुमतानं विजय मिळवला आहे. यानंतर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकाचा चेहरा म्हणून कोण असणार यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत. यूपीएच्या नवीन नेतृत्वाचाही सध्या शोध सुरु आहे. यामध्ये शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आणखी असाच प्रयोग केला जाणार का? अशाही चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: