जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2022 पर्यंत पूर्ण करणार, अजित पवारांची घोषणा

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2022 पर्यंत पूर्ण करणार, अजित पवारांची घोषणा

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2022 पर्यंत पूर्ण करणार, अजित पवारांची घोषणा

‘भव्य दिव्य स्मारक उभा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जानेवारी : ‘महाविकास आघाडी सरकारकडून 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदु मिल येथील स्मारक पूर्ण केलं जाईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ‘मुंबईत आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला पाहावसं वाटेल असं भव्य दिव्य स्मारक उभा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. ‘पंतप्रधानांनी 2015 साली या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं. आम्हाला राज्य सरकारमध्ये सुदैवाने संधी मिळाली आहे. इतकं मोठं स्मारक होत आहे ते पाहावं म्हणून इथे आम्ही आलो. यात काही गोष्टी आहेत मात्र त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन. स्मारकाबाबत बऱ्याच परवानग्या मिळाल्या आहेत. काही परवानग्या बाकी आहेत. त्या राज्य सरकारच्या अख्यातरीत आहेत म्हणून काही अडचणी येणार नाहीत,’ असंही स्मारक परिसराला भेट दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले. ..नाहीतर मी गाडीत बसून निघून जाईन, अजितदादा जेव्हा भडकतात अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: - स्मारकासाठी लागणारे पैसे राज्य सरकार देईल - सर्व परवानग्या मिळाल्यानंतर 2022 पर्यंत स्मारक बनवण्याचं टार्गेट आहे - मागची जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही - निधी कुठल्या ही परिस्थिती कमी पडणार नाही - काही निर्णय झाले ते ठराविक पद्धतीने झाले मात्र कॅबिनेटमध्ये निर्णय झालेले नाही त्यामुळे आता ते होतील - 14 एप्रिल 2022 पर्यंत काम पूर्ण होईल आणि स्मारक सर्वांसाठी खुलं होईल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात