अजित पवारांची कोरोनावर मात, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

अजित पवारांची कोरोनावर मात, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

26 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अजितदादांना दाखल करण्यात आले होते.

  • Share this:

मुंबई, 02 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे नेते (national congress party) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनावर मात केली आहे. अजित पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (breach candy hospital)उपचार सुरू होते. आज त्यांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर  26 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अजितदादांना दाखल करण्यात आले होते. अजित पवारांची कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती.

राज्यपाल नियुक्त 12 नावं फडणवीस आणि राज्यपाल बाजूला काढतील, राष्ट्रवादीचा आरोप

त्याआधी  22 ऑक्टोबर रोजी अजितदादांना थंडी, ताप जाणवू लागला होता. पण कोरोनाची चाचणी ही निगेटिव्ह आली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून पुढील चार दिवस त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करून घेतले होते. पण, तब्येत सुधारत नसल्यामुळे त्यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटल गाठले. त्यावेळी कोरोनाची दुसरी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर अजितदादांना उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

अखेर उपचाराअंती अजितदादांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना आज दुपारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे अजितदादांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते.

कारच बोनेट उघडताच दिसला 10 फूटांची अजगर, पुढे काय झालं पाहा VIDEO

त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांना सुद्धा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

याआधीही राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यानंतर धनंजय मुंडे यांचाही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली.

Published by: sachin Salve
First published: November 2, 2020, 2:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या