मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील 'या' भागात हवेचा दर्जा दिल्लीहूनही खराब; चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

मुंबईतील 'या' भागात हवेचा दर्जा दिल्लीहूनही खराब; चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

मुंबईतील कुलाबा येथे हवेचा दर्जा (Air quality in colaba mumbai) दिल्लीहून खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांची चिंता वाढली आहे.

मुंबईतील कुलाबा येथे हवेचा दर्जा (Air quality in colaba mumbai) दिल्लीहून खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांची चिंता वाढली आहे.

मुंबईतील कुलाबा येथे हवेचा दर्जा (Air quality in colaba mumbai) दिल्लीहून खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांची चिंता वाढली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 नोव्हेंबर: भारताची राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता (Air quality in delhi) ढासळल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना एक आठवड्याची सुट्टी देण्यात आली आहे. खराब हवेमुळे आरोग्या धोका असल्यानं ऑनलाइन क्लासेस घेण्याच्या सुचना दिल्लीतील शाळांना देण्यात आल्या आहेत. यावरून दिल्लीतील हवा किती दर्जाहीन आहे, याचा प्रत्यय येतो. पण मुंबईनं आता दिल्लीलाही मागं टाकलं आहे. मुंबईतील कुलाबा येथे हवेचा दर्जा (Air quality in colaba mumbai) दिल्लीहून खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांची चिंता वाढली आहे.

सिस्टम फॉर एअर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) या संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईतील कुलाबा येथे हवा 345 एक्यूआय नोंदली गेली आहे. जी अत्यंत खराब श्रेणी मानली जाते. तर दिल्लीतील हवेचा दर्जा 331 एक्यूआय इतका आहे. याबाबत अधिक माहिती देताना सफरचे प्रमुख गुफरान बेग यांनी सांगितलं की, मुंबईतील हवेचा दर्जा घसरण हा हवामानातला अस्थायी बदल आहे. पुढील एक दोन दिवसांत मुंबईतील हवा पुन्हा ठीक होण्याची शक्यता आहे. पण अशा वातावरणात राहणं धोक्याचं आहे. यामुळे श्वसन विकाराचे आजार उद्भवू शकतात.

हेही वाचा-अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपला भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

केईएम रुग्णालयातील चेस्ट विभागाचे प्रमुख डॉ.अमिता आठवले यांनी सांगितलं की, प्रदूषणामुळे अस्थमा आणि ब्रोंकायटिस असलेल्या लोकांना सर्वाधिक त्रास होतो. या काळात त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे माजी अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी सांगितलं की, हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे वातावरणातील प्रदूषणाचे अनेक छोटे कण श्वसननलिकेत जातात. त्यामुळे लोकांना दम्याचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते.

हेही वाचा-लग्न जमत नसल्याने मुलीला हुंडा देत थाटला संसार; तिसऱ्याच दिवशी नवरीनं दाखवला रंग

खरंतर, मुंबईच्या वातावरणातील हवेचा दर्जा तपासण्यासाठी सफर संस्थेद्वारे मुंबईतील आसपासच्या परिसरात 10 ठिकाणी मॉनिटरींग यंत्रणा बसवण्यात आली आहे. यातील 6 ठिकाणी हवेचा दर्जा अत्यंत खराब असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये कुलाबा याठिकाणी 345 एक्यूआय, मालाड 306 एक्यूआय, माझगाव 325 एक्यूआय आणि बीकेसी 314 एक्यूआय हवेची नोंद झाली आहे. अंधेरीतही हवेचा खराब दर्जा नोंदवण्यात आला आहे. याठिकाणी 259 एक्यूआय हवेची नोंद करण्यात आली आहे. तर वरळी, चेंबूर, बोरीवली आणि भांडूप याठिकाणी हवेचा दर्जा सामान्य श्रेणीत आहे.

First published:

Tags: Mumbai