मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'अखेर मी मुंबईला आलोय, सभा घेणारच', इम्तियाज जलील यांचं राज्य सरकारला आव्हान

'अखेर मी मुंबईला आलोय, सभा घेणारच', इम्तियाज जलील यांचं राज्य सरकारला आव्हान

"आम्ही जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा कोरोना, ओमायक्रोन, कायदे-कानून येतात. असदुद्दीन ओवेसी यांची आता सभा होईल. हे जे काही नाटक सुरुय ते या साठीच सुरु आहे", असं इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले.

"आम्ही जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा कोरोना, ओमायक्रोन, कायदे-कानून येतात. असदुद्दीन ओवेसी यांची आता सभा होईल. हे जे काही नाटक सुरुय ते या साठीच सुरु आहे", असं इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले.

"आम्ही जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा कोरोना, ओमायक्रोन, कायदे-कानून येतात. असदुद्दीन ओवेसी यांची आता सभा होईल. हे जे काही नाटक सुरुय ते या साठीच सुरु आहे", असं इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले.

मुंबई, 11 डिसेंबर : एमआयएमचे (AIMIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) अखेर नवी मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. ते मानखुर्दला पोहोचले आहेत. त्यांचा ताफा मानखुर्दला पोहोचला तेव्हा त्यांनी "मी म्हटलं होतं ना मुंबईला येणार. अखेर मी मुंबई आलोच. काय करायचं ते करा", असं आव्हान इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) दिलं आहे. "मी मुंबईला आलेलो आहे. सकाळपासून हेच सांगत होते की, औरंगाबादहून तुम्हाला सोडणार नाहीत. अहमदनगरपासून तर तुम्ही निघूच शकत नाही. पुण्याला तर तुम्ही पोहोचूच शकत नाहीत. आणि आता आम्ही मुंबईत पोहोचलो. आज सभा होणार. मी माझ्या कार्यकर्त्यांना शब्द दिला होता. मी पहिल्यांदा चलो मुंबईचा नारा दिला होता. दुसऱ्यांदा मी मुंबईतो हम आएंगे, असं म्हटलं होतं. आम्ही आता मुंबईला आलोय", असं इम्तियाज 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया देताना म्हणाले.

इम्तियाज यांचा सरकारवर निशाणा

"ही तुमची हुकूशाही आहे का? सर्व कायदे फक्त आमच्याचसाठी आहेत का? बाकी सर्व लोकांचे कार्यक्रम, समारंभ होत आहेत. सर्व राजकीय पक्षांचे आंदोलने होत आहेत. आम्ही जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा कोरोना, ओमायक्रोन, कायदे-कानून येतात. असदुद्दीन ओवेसी यांची आता सभा होईल. हे जे काही नाटक सुरुय ते या साठीच सुरु आहे की आम्ही त्यांची पोलखोल करण्यासाठी आलो आहोत. मुस्लिमांची जमीन त्यांनी बळकावली आहे. 93 हजार एकर जमीन त्यांनी घेतली आहे. हायकोर्टाने आम्हाला पाच टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिले असताना तुम्ही का ते देत नाहीयत? मुसलमान हा तुमच्यासाठी मशीन बनलाय का? पाच वर्षांनी तुम्ही येऊन मत द्या असं सांगणार आणि आम्ही मत देणार. यांच्याजवळ उत्तरे नाहीत. सरकार आम्हाला घाबरते त्यामुळे पोलिसांना पुढे करत आहे", असा घणाघात इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.

हेही वाचा : इम्तियाज जलील यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना टोलमाफी? टोल न घेता गाड्या सोडल्या

पोलिसांनी इम्तियाज जलील यांना अडवलं

दरम्यान, पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्या ताफ्याला अडवलं. यावेळी पोलिसांनी इम्तियाज यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण इम्तियाज मुंबईच्या दिशेला जाण्यावर ठाम होते. विशेष म्हणजे जलील हे मानखुर्द जकात नाक्यावर गाडीतून खाली उतरले. त्यानंतर ते पायी मुंबईच्या दिशेला निघाले. पण पोलिसांनी त्यांना जाण्यापासून रोखलं. यावेळी त्यांची पोलिसांसोबत काहीशी बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानंतर इम्तियाज यांच्या गाडीसह आणखी काही कार्यकर्त्यांना मुंबईच्या दिशेला सोडण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी इतर कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या.

First published:
top videos