Home /News /mumbai /

मोदी सरकारला आता आली जाग, जाहीर केलेली 701 कोटींची मदत मागच्या वर्षीची!

मोदी सरकारला आता आली जाग, जाहीर केलेली 701 कोटींची मदत मागच्या वर्षीची!

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी 3721 कोटींची मागणी राज्य सरकारने (mva government) केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेवून 4375 कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले होते.

    मुंबई, 27 जुलै : राज्यावर अस्मानी संकट (maharashtra flood) आले असून मदत देण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. अशातच केंद्र सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना 701 कोटी रुपये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी घाईघाईने जाहीर केले. पण, हा निधी 2020 मध्ये झालेल्या नुकसान भरपाईचा होता, अशी धक्कादायक बाबसमोर आली आहे. केंद्र सरकारच्या या लेटलतिफ कारभारबद्दल राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (State Agriculture Minister Dada Bhuse) यांनी आभार मानले आहे. राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफ मधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर आज म्हणजे, वर्षभरानंतर लोकसभेमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी धन्यवाद दिले आहेत. IND vs SL : द्रविड श्रीलंकेच्या कर्णधारासोबत काय बोलला? गुपित उलगडलं! गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी 3721 कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेवून 4375 कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले होते. राज्याने केलेल्या 3721 कोटी रुपयांच्या मागणीपैकी 701 कोटी रुपये मदत देण्याचे आज केंद्र शासनाने घोषित केले आहे,अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. चिपळूण स्वच्छतेसाठी 2 कोटींची घोषणा, ठाणे पालिकेचे कर्मचारी पोहोचणार मदतीला राज्यावर आताही अस्मानी संकट आले आहे. सध्याच्या नुकसानीसाठी देखील तातडीने मदतीची विनंती गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण तसंच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थ‍िक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल, अशी अपेक्षाही कृषी मंत्री भुसे यांनी व्यक्त केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या