Unlock 1: 75 दिवसांच्या Lockdownनंतर मुंबईकरांनी मारला वडापावर ताव, मैदानावरही धूम!

दादर मधलं शिवाजी पार्कही आज पुन्हा एकदा मुलांनी गजबजलं, त्यांनी क्रिकेट, फुटबाँल, मल्लखांबची प्रॅक्टीस करण्यास सुरवात केलीय.

दादर मधलं शिवाजी पार्कही आज पुन्हा एकदा मुलांनी गजबजलं, त्यांनी क्रिकेट, फुटबाँल, मल्लखांबची प्रॅक्टीस करण्यास सुरवात केलीय.

  • Share this:
मुंबई 8 जून:  तब्बल 75 दिवसांच्या लाँकडाऊन नंतर मुंबईतील जनजीवन थोडं रुळावर येऊ लागलं आहे. जिवंत आणि कधीच न थांबणारं शहर, मायानगरी अशी मुंबईची ओळख आहे. मात्र कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनमुळे हे जिवंत शहर थबकलं होतं. दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस सगळे व्यवहार ठप्प होते. मुंबईतून लाखो मजुरांनी आपल्या गावाकडे धाव घेतली होती. त्यामुळे आता सुट मिळताच लोकांनी आपला आवडता वडापावर ताव मारला आणि मैदानांवर मुलं क्रिकेट खेळू लागली. वडापाव हा मुंबईकरांचा जीव की प्राण समजला जातो. अनेक स्ट्रगलर्स तर अनेक दिवस हे फक्त वडा पाव खाऊनच राहतात. गेले दोन महिने मुंबईकरांना वडापाव खाता आला नाही. त्यामुळे आज सुट मिळताच दादरमधल्या दुकानांवर लोकांनी गर्दी केली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन काही ठिकाणी होत होतं. तर काही दुकानांवर लोकांनी गर्दी केली होती. तर दादर मधलं शिवाजी पार्कही आज पुन्हा एकदा मुलांनी गजबजलं, त्यांनी क्रिकेट, फुटबाँल,  मल्लखांबची प्रॅक्टीस करण्यास सुरवात केलीय. तसेच शिवाजी पार्क कट्टा पुन्हा एकदा नागरिकांनी फुलून गेलांय. राजावाडी रुग्णालयातून पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांचा आरोप दरम्यान, आजही राज्यात  2553 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 88528वर गेली आहे. काल राज्यात 3 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली  होती. राज्यात आज १०९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ही एकूण ३१६९ एवढी झाली आहे. आज  १६६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात एकूण ४४३७४ अॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सूट मिळताच पुण्यातल्या 'या' भागात मोठा फटका, 12 रुग्णांवरून आकडा थेट 372 वर या रुग्णसंख्येत एकट्या मुंबईचाच आकडा हा तब्बल ५० हजारांच्या वर आहे. मुंबईत एकूण ५००८५ रुग्ण आहेत. संपादन - अजय कौटिकवार  
First published: