जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / काका राज ठाकरेंच्या पावलावर आदित्य यांचे पाऊल, शिवसैनिकांना लिहिले पत्र

काका राज ठाकरेंच्या पावलावर आदित्य यांचे पाऊल, शिवसैनिकांना लिहिले पत्र

काका राज ठाकरेंच्या पावलावर आदित्य यांचे पाऊल, शिवसैनिकांना लिहिले पत्र

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत वाढदिवस साजरा न करण्याचं जाहीर केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जून : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यास येऊ नये, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत वाढदिवस साजरा न करण्याचं जाहीर केलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा उद्या म्हणजे 13 जून रोजी वाढदिवस आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस  साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे. या परिस्थितीशी आपण गेल्या 2-3 महिन्यापासून एकत्रित लढा देत आहोत. माझा 13 जून रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे या परिस्थितीत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं आहे.

जाहिरात

आपण  जिथे आहात तिथूनच शुभेच्छा देण्याचं आदित्य यांचं शिवसैनिकांना आवाहन केले आहे. होर्डिंग्ज, हार-तुरे यावर खर्च टाळून तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, याच मला आनंद होईल, असं आवाहन आदित्य यांनी केलं. राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस विशेष म्हणजे, आदित्य यांचा वाढदिवस हा 13 जून रोजी आहे. तर काका आणि  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस हा 14 जून रोजी आहे.  राज ठाकरे यांनीही   कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे  तिथेच जनतेला मदत करा, असा आदेश देणारं जाहीर पत्र कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिलं आहे. **हेही वाचा -** वधूच्या मेकअपसाठी चालल्या होत्या बहिणी, पण वाटेत घडले भीषण… राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की, ‘कोरोनामुळे यंदा वेगळी परिस्थिती आहे. सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहे की, कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथेच जनतेला मदत करा, दिलासा द्या. ह्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत.’ संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात