Home /News /maharashtra /

वधूच्या मेकअपसाठी चालल्या होत्या बहिणी, पण वाटेत घडले भीषण...

वधूच्या मेकअपसाठी चालल्या होत्या बहिणी, पण वाटेत घडले भीषण...

केडगाव सोनेवाडी बायपास चौकात एका महिलेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर या चौकांमध्ये आत्तापर्यंत अपघातच नऊ जणांचा बळी गेला आहे.

अहमदनगर, 12 जून : जिल्ह्यातील केडगाव येथील केडगाव-सोनेवाडी बायपास रस्त्यावर मालट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या दोन बहिणींपैकी एक बहीण जागीच ठार झाली. मनीषा कापरे या अपघातात मृत्यू झाला आहे. तर  रेखा चव्हाण ही महिला गंभीर जखमी झाली आहे. मनीषा आणि रेखा या दोन्ही बहिणींचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होत्या. लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात अटी शिथिल झाल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून अडकून पडलेले लग्न सोहळे आता पार पाडले जात आहे. सोनेवाडी इथं एक लग्न सोहळा संपन्न होत आहे. हेही वाचा -अमानवी कृत्य! 14 मृतदेहांसोबत असं कुणी करत का? कर्मचाऱ्यांचा धक्कादायक VIDEO मनीषा आणि रेखा या  सोनेवाडी येथे एका नववधूचा मेकअप करण्यासाठी निघाल्या होत्या. सोनेवाडी बायपास चौकात पोहोचल्या असता अरणगाव च्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यावेळी ट्रकच्या धडकेने एका बहिण  जागीच ठार झाली तर एक महिला गंभीर जखमी झाली. जखमी रेखा चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. घटनास्थळावरून ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला आहे. दरम्यान, केडगाव सोनेवाडी बायपास चौकात एका महिलेचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर या चौकांमध्ये आत्तापर्यंत अपघातच नऊ जणांचा बळी गेला आहे. या चौकात वारंवार अपघात होत असतानाही बांधकाम विभागाकडून या चौकात सुरक्षेच्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारमधून मोठी बातमी, काँग्रेस नेत्यांनी घेतली नवी भूमिका  संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: अपघात, अहमदनगर, बहिणी

पुढील बातम्या