मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'तू मरुन जा...; प्रेयसीच्या संतापनंतर तरुणानं FB लाइव्ह करत संपवलं जीवन, मुंबईतील धक्कादायक घटना

'तू मरुन जा...; प्रेयसीच्या संतापनंतर तरुणानं FB लाइव्ह करत संपवलं जीवन, मुंबईतील धक्कादायक घटना

किरकोळ कारणातून वाद (Hassle with girlfriend) झाल्यानंतर, 'मला तुझी गरज नाही, तू मरून जा' असे उद्गार प्रेयसीनं काढल्यामुळे मुंबईत एका तरुणानं खरोखर आत्महत्या (Suicide in Mumbai) केली आहे.

किरकोळ कारणातून वाद (Hassle with girlfriend) झाल्यानंतर, 'मला तुझी गरज नाही, तू मरून जा' असे उद्गार प्रेयसीनं काढल्यामुळे मुंबईत एका तरुणानं खरोखर आत्महत्या (Suicide in Mumbai) केली आहे.

किरकोळ कारणातून वाद (Hassle with girlfriend) झाल्यानंतर, 'मला तुझी गरज नाही, तू मरून जा' असे उद्गार प्रेयसीनं काढल्यामुळे मुंबईत एका तरुणानं खरोखर आत्महत्या (Suicide in Mumbai) केली आहे.

मुंबई, 06 ऑगस्ट: किरकोळ कारणातून वाद (Hassle with girlfriend) झाल्यानंतर, 'मला तुझी गरज नाही, तू मरून जा' असे उद्गार प्रेयसीनं काढल्यामुळे मुंबईत एका तरुणानं खरोखर आत्महत्या (Suicide in Mumbai) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित तरुणानं फेसबुक लाइव्ह करत आपली जीवनयात्रा (Suicide on facebook live) संपवली आहे. प्रेयसीनं छळामुळेच तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

माझी प्रेयसी पहिल्यासारखा प्रतिसाद देत नाही. याबाबत विचारणा केली असता, तरुणीने मला तुझी गरज नाहीये, तू मरून जा....' असं म्हटल्यामुळे मुंबईतील एका तरुणानं आत्महत्या केली आहे. अंकुश नामदेव पवार असं आत्महत्या करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मुळ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी आहे.

हेही वाचा-प्रियकरानं Video Call वरून दिलं हत्येचं ट्रेनिंग; लेकीनं जन्मदातीचाच काढला काटा

घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं मृत अंकुश हा चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबईला आला होता. येथे आल्यानंतर कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. सुरुवातीला सर्वकाही ठिक सुरू होते. दरम्यान त्याची ओळख एका घटस्फोट झालेल्या तरुणीशी झाली. कालांतराने त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघं एकमेकांशी लग्नही करणार होते. मागील तीन वर्षांपासून अंकुशचे संबंधित तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते.

हेही वाचा-15वर्षांवरील वयाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणं बलात्कार? हाय कोर्टाचा निर्णय

लग्न करण्यासाठी अंकुश आपल्या कमाईचे पैसे प्रेयसीकडे जमा करून ठेवत होता. पण जमा केलेले पैसे प्रेयसी पार्टी आणि मौज करण्यासाठी उडवत असल्याची माहिती अंकुशला मिळाली. यामुळे अंकुशनं आपल्या प्रेयसीला याबाबत विचारणा केली. यातून दोघांत खटके उडू लागले. तिने अंकुशला उद्धटपणे उत्तरं द्यायला सुरू केली. प्रेयसीचं वागणं जिव्हारी लागल्यानं त्यानं मरुन जाण्याची धमकी दिली. प्रेयसीनं देखील 'तू मरून जा, मला तुझी गरज नाही' असं सुनावलं.

हेही वाचा-पुणे: मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्यानं तरुणाची सटकली; अल्पवयीन मुलावर चाकूनं वार

प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर अंकुशनं काही मिनिटांत फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं प्रेमात धोका मिळाल्यानं आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. संबंधित घटना गुरुवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली आहे. प्रेयसीनं छळ केल्यामुळेच आपल्या मुलानं आत्महत्या केल्याचा आरोपी मृताच्या नातेवाईकांकडून लावण्यात आला आहे. या घटनेबाबत कायदेशीर कारवाई केल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही.

First published:
top videos

    Tags: Crime news, Mumbai, Person suicide