मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /गिरीश महाजन यांच्या जाहीर माफीनाम्यानंतर अजित पवारांचीही दिलगिरी; काय आहे प्रकरण?

गिरीश महाजन यांच्या जाहीर माफीनाम्यानंतर अजित पवारांचीही दिलगिरी; काय आहे प्रकरण?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

पुणे येथील कार्यक्रमात भाषण करताना झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 जानेवारी : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करत माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, अजित पवार यांनी मी माझ्या भूमिकेवर ठाम असून माफी मागणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, पुणे येथील एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांनी स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली आहे. आज सकाळीच भाजप नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चुकीच्या उल्लेख केल्याबद्दल जाहीर माफी मागितली होती.

अजित पवार यांनी दिलगिरी का व्यक्त केली?

विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यात आले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी येथील कार्यक्रमात भाषणावेळी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब' या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' ऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' असा उल्लेख झाला. 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

वाचा - उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचे आरोप चुकीचे, राज्य महिला आयोगानेच धाडली उलट नोटीस

गिरीश महाजन यांचं प्रकरण काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्याचं लक्षात आल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे. माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख करण्याचा काहीही उद्देश नव्हता. माझ्याकडून तसा उल्लेख झाल्याने मी माफी मागतो आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अनावधानाने झाला. चॅनलवर दाखवलं गेलं तेव्हाच लक्षात आलं की मी अनावधानाने उल्लेख केला. मी जाणीवपूर्वक असा उल्लेख करण्याचा काही प्रश्नच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं आदरस्थान आहे. माझ्याही मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्यामुळे या विषयाचं राजकारण कुणीही करू नये असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं होतं अमोल मिटकरी यांनी?

एका पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी शिवाजी अवॉर्ड विजेते असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता. त्यानंतर आता गिरीश महाजन स्पष्टीकरण देऊन या प्रकरणात माफी मागितली आहे. श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या कार्यक्रमात हा उल्लेख गिरीश महाजन यांच्याकडून झाला होता. मात्र आपण जाणीवपूर्वक असं काहीही केलं नाही असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Girish mahajan, Pune