मुंबई 8 जून: रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात कातकरी आदिवासी कुटुंबांचं घर शेती वाडीचं नुकसान झालं आहे. या आदिवासी कुटुंबीयांना आदिवासी विकास महामंडळाने मदत म्हणून तांदूळ वरई इत्यादी धान्यपुरवठा करण्याचे ठरवले आहे. चक्रीवादळाने झोडपल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी ही मदत आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत आहे. या भागात मोठं नुकसान झाल्याने तातडीने मदत पोहोचवा असे आदेश आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी दिली होते. स्थानिक पुरवठा प्रशासन विभागाच्या वतीने आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत समन्वय ठेवून धान्य पुरवठा करा अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली होती. हे धान्य घरपोच करावे अशा सूचनाही आदिवासी विकास मंत्र्यांनी दिल्या होत्या. रायगड जिल्ह्यात डोंगर कपारी भागांमध्ये कातकरी कुटुंब मोठ्या संख्येने राहतात या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचं निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पीडितांना तातडीने मदत पोहोचायला पाहिजी होती. मात्र ती मिळीली नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. मुळातच या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे. अशा कुटुंबीयांना तातडीने अन्नधान्य कपडे घराचे बांधकामाचे साहित्यअशा प्रकारची मदत तातडीने मिळणे गरजेचं आहे असं पत्रही मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. 75 दिवसांच्या Lockdownनंतर मुंबईकरांनी मारला वडापावर ताव, क्रिकेटचीही धूम! रायगड जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ३३५ तर रत्नागिरी जिल्ह्यात ९४ हजार ५२६ इतक्या शिधापत्रिकाधारकांना मोफत केरोसिन व रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांनामोफत केरोसिन वाटप करण्यात येणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अंदाज ठरतोय खरा, आजही राज्यात 2553 नव्या रुग्णांची भर निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड,रत्नागिरी या भागात वीज नसल्याने दिवे यासाठी राॅकेल वापर होईल अशी माहिती अन्न व धान्य पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.