जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / पोलिसांना बघताच आरोपीनं चौथ्या मजल्यावरून मारली उडी; ठाण्यातील थरारक घटना

पोलिसांना बघताच आरोपीनं चौथ्या मजल्यावरून मारली उडी; ठाण्यातील थरारक घटना

Representative Image

Representative Image

Crime in Thane: एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीनं अटक टाळण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी (accused jumped from fourth floor) मारली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 04 जुलै: ठाणे जिल्ह्याच्या भिवंडीतील (Bhiwandi) कसई वाडा याठिकाणी शुक्रवारी गुजरात पोलीसाचं पथक आणि स्थानिक भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावानं हल्ला (Attack on police) केल्याची घटना समोर आली होती. आता या घटनेचा पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलं असता, आरोपीनं पोलिसांना पाहून चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याची (accused jumped from fourth floor) माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये संबंधित आरोपीचा जागीच मृत्यू झाला होता. पण संबंधित आरोपीचा मृत्यू पोलिसांनी मारहाण केल्यानं झाल्याचं समजून जमावानं पोलिसांवर हल्ला केला होता. जमील कुरेशी असं मृत्यू झालेल्या 38 वर्षीय आरोपीचं नाव आहे. पोलिसांना बघताच आरोपी जमीलनं अटक टाळण्यासाठी चौथ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उडी मारली. चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृताचे कुटुंबीय व स्थानिक लोक बाहेर आले आणि पोलिसांनीच त्याचा जीव घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त जमावानं काही पोलिसांना मारहाण केली अशी माहिती भिवंडी परिसरातील उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. हेही वाचा- मैत्रिणीला दारू पाजून तरुणाचं धक्कादायक कृत्य;4 मित्रांना फोन करून बोलावलं अन्.. शुक्रवारी घडलेल्या या थरारक घटनेचे काही  व्हिडीओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यामध्ये असंख्य पुरुष आणि महिला पोलिसांना मारहाण करताना दिसत आहेत. काहींनी पोलिसांवर दगडफेकही केली आहे. संबंधित घटनेत भिवंडी पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी जखमी देखील झाले आहेत. मारहाण झाल्यानंतर संबंधित दोन्ही पोलिसांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा- हसत्या खेळत्या कुटुंबाला लागली नजर; एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींची आत्महत्या शुक्रवारी पोलिसांच्या पथकाला झालेल्या मारहाणी प्रकरणी निजामपुरा पोलिसांनी गुन्हेगारांची ओळख पटवली आहे. संबंधित आरोपींवर दंगा, मारहाण किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर आणि सरकारी सेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण संबंधित परिसर हा संवेदनशील असल्यानं आरोपींना अटक करणं पोलिसांपुढे एक आव्हान बनलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था  राखत योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात