• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Latur: हसत्या खेळत्या कुटुंबाला लागली नजर; एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींनी संपवलं जीवन

Latur: हसत्या खेळत्या कुटुंबाला लागली नजर; एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींनी संपवलं जीवन

Suicide in Latur: लातूर शहरातील गोविंदनगर भागात एकाच साडीनं गळफास घेत दोन बहिणींनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:
    लातूर, 04 जुलै: लातूर (Latur) शहरातील गोविंदनगर भागात एकाच साडीनं (Saree) गळफास घेऊन दोन मावस बहिणींनी आत्महत्या (two sisters commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हसत्या खेळत्या कुटुंबातील दोन बहिणींनी असं टोकाचं पाऊल उचलल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. गीतांजली बनसोडे (वय-17) आणि धनश्री क्षीरसागर (वय-20) असं आत्महत्या करणाऱ्या मावस बहिणींची नावं आहेत. लातूर शहरालगत हरंगुळ रोड परिसरातील गोविंद नगरमध्ये त्या आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. शनिवारी सकाळी 10 ते 11 च्या सुमारास दोन्ही बहिणी कपडे धुवायचं कारण सांगून तळमजल्यावरून घराच्या वरच्या मजल्यावर गेल्या. वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत दोघींनी एकाच साडीनं गळफास लावून आयुष्याचा शेवट केला आहे. हेही वाचा-आईनंच 5 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात टाकला लोखंडी रॉड; धक्कादायक घटनेनं खळबळ बराच वेळ झाला तरी मुली खाली आल्या नाहीत, म्हणून घरातील एका सदस्यानं वरच्या मजल्यावर जाऊन खोलीचा दरवाजा वाजवला. पण खोलीतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुटुंबातीस सदस्यानं आत डोकावलं असता, दोन्ही बहिणींचा गळफास लावल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळले. दोघींनी एकाच साडीनं गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. या घटनेची माहिती होताच, कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. हेही वाचा-तरुणानं अल्पवयीन प्रेयसीची केली हत्या, व्हिडिओ शेअर करत सांगतिलं धक्कादायक कारण संबंधित दोन्ही मावस बहिणींनी नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. आत्महत्येपूर्वी मृत बहिणींनी सुसाइड नोटही लिहिली नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं गूढ बनलं आहे. या घटनेचा पुढील तपास लातूर एमआयडीसी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published: