मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

SEXTORTION! मुलगी बनून तरुणांनी केला कॉल, अश्लील VIDEO बनवून केलं ब्लॅकमेल

SEXTORTION! मुलगी बनून तरुणांनी केला कॉल, अश्लील VIDEO बनवून केलं ब्लॅकमेल

काही तरुणांनी मुलगी असल्याचं भासवत एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल केल्याची (Criminal makes sexual video of a man and blackmails him for 1 lakh) आणि त्याचा अश्लिल व्हिहिओ बनवून ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

जयपूूर, 5 ऑक्टोबर : काही तरुणांनी मुलगी असल्याचं भासवत एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल केल्याची (Criminal makes sexual video of a man and blackmails him for 1 lakh) आणि त्याचा अश्लिल व्हिहिओ बनवून ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे. काही तरुणांनी ऑनलाईन ब्लॅकमेलिंगचा (Online extortion) डाव रचत एका गृहस्थाला फोन केला. मुलगी असल्याचं भासवत त्याच्याशी मैत्री वाढवली आणि अश्लिल संभाषण करत त्याचा (Video call recording) व्हिडिओ रेकॉर्ड केला.

अशी घडली घटना

राजस्थानच्या भरतपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला एका मुलीचा व्हिडिओ कॉल आला. प्रत्यक्षात हा कॉल काही तरुणांनी केला होता. मात्र या व्हिडिओ कॉलवर मुलीचा एक व्हिडिओ त्यांनी प्ले केला. त्यामुळे ती मुलगीच आपल्याशी बोलत आहे, असं त्या व्यक्तीला वाटलं. पुढे व्हिडिओतील त्या मुलीने काही अश्लिल हावभाव आणि कृती करायला सुरुवात केली. ते पाहून उत्तेजित झालेल्या व्यक्तीनेही तिला ऑनलाईन प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.

व्हिडिओ केला रेकॉर्ड

कॉलवर प्रत्यक्ष मुलगी नसून तिचा केवळ व्हिडिओ प्ले केला जात असल्याचं या व्यक्तीला समजलं नाही. तो तिला ऑनलाईन व्हिडिओ कॉलमध्ये प्रतिसाद देत राहिला आणि लुटारू तरुणांनी त्या इसमाला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला. काही वेळानंतर त्याची ती क्लिप तरुणांनी त्याच्या मोबाईलवर पाठवली. हे पाहून त्या व्यक्तीला जबर धक्का बसला.

हे वाचा - आईची केली हत्या; मग घरातच मृतदेहासोबत काढले 2 महिने, कारण जाणून पोलिसही हादरले

तरुणांनी केले ब्लॅकमेल

ही व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांनी त्या व्यक्तीकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. या प्रकाराने घाबरलेल्या व्यक्तीने तरुणांना 1 लाख रुपये आणि लगेचच पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरु केला आणि व्हॉट्सअप कॉलचा नंबर आणि इतर तपशील मिळवत आरोपींना अटक केली. पोलिसांनी समीन नावाच्या गुन्हेगाराला अटक केली असून या टोळीने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

First published:

Tags: Crime, Online crime, Video call