जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडचणीत, चौकशीत NCB ला दिली कबुली, म्हणाला; मी...

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडचणीत, चौकशीत NCB ला दिली कबुली, म्हणाला; मी...

   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik)यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik)यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे.

आर्यन खान (Aryan Khan) यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्यन खानची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 ऑक्टोबर: एनसीबीने (NCB raid) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं (NCB) मोठ्या प्रमाणात ड्रग्स (large quantity of drugs) जप्त केली आहेत. एनसीबीनं यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. तसंच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood actor Shah Rukh Khan’s son) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्यन खानची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने कबूल केले की तो या पार्टीचा भाग होता. त्यानं आपण चूक केल्याची कबुलीही दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यननं ड्रग्सचं सेवन केल्याचंही कबूल केलं आहे.

जाहिरात

त्याचवेळी, सूत्रांनी पुढे असंही सांगितलं आहे की, अभिनेता शाहरुख खानने एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आपल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे. ज्यांची टीम सध्या एनसीबीच्या कार्यालयात हजर आहे. दरम्यान, यासंदर्भात शाहरुख खानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हेही वाचा-  मनोज वाजपेयींवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं निधन सुरुवातीच्या चौकशीत अभिनेत्याच्या मुलानं सांगितलं होतं की, या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनचा मोबाईलही जप्त केला आहे. ज्यात ड्रग्स संदर्भातले चॅट्स मिळाले आहेत. सुत्रांच्या मते,, जेव्हा या चॅट्सबद्दल चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यानं हौस म्हणून ड्रग्स घेतल्याचं कबूल केलं. एनसीबीची अधिकृत माहिती हेही वाचा-  Sidharth Shukla करत होता डिलिव्हरी बॉयचं काम? पिझ्झा डिलिव्हरी करतानाचे फोटो व्हायरल या कारवाईनंतर NCB नं अधिकृत माहिती (Official Statement of NCB) दिली आहे. एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या अधिकाऱ्यांनी 02.10.2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला. या ऑपरेशन दरम्यान MDMA/ एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले. यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा 94/21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात