जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sidharth Shukla करत होता डिलिव्हरी बॉयचं काम? पिझ्झा डिलिव्हरी करतानाचे फोटो व्हायरल

Sidharth Shukla करत होता डिलिव्हरी बॉयचं काम? पिझ्झा डिलिव्हरी करतानाचे फोटो व्हायरल

Sidharth Shukla करत होता डिलिव्हरी बॉयचं काम? पिझ्झा डिलिव्हरी करतानाचे फोटो व्हायरल

सिद्धार्थच्या या फोटोमध्ये डिलिव्हरी बॉयच्या गेटअपमध्ये तो पिझ्झा ऑर्डर देताना दिसत आहे. त्यांच्यासोबत एक पिझ्झा बॉक्स देखील दिसतो. डिलिव्हरी बॉयच्या लूकमधील त्याच्या वेगवेगळ्या पोझमधील फोटो दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 ऑक्टोबर : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. त्याचे चाहते, कुटुंबीय यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याला जावून आता जवळपास एक महिना होऊन गेला आहे. बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss 13 Winner Sidharth Shukla) आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Actor Sidharth Shukla Death) आता आपल्यात नाही, यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे. त्याचे सहकलाकार देखील या घटनेने पुरते हादरून गेले आहेत. त्याच्या विषयी सोशल मीडियावर अजूनही पोस्ट शेअर होत असतात. अशाच एका सोशल मीडिया पोस्टची आता चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडिया पोस्टवरून सिद्धार्थचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिद्धार्थ शुक्लाचे हे खूप जुने फोटो आहेत. सिद्धार्थ शुक्ला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात असा दिसत होता आणि त्याच्या मोठ्या मिश्याही होत्या.

जाहिरात

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सिद्धार्थ शुक्ला पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. तसेच, त्याच्या चेहऱ्यावर भरदार मिशा आहेत. याशिवाय सिद्धार्थने चष्मा घातला आहे. सिद्धार्थच्या या फोटोमध्ये डिलिव्हरी बॉयच्या गेटअपमध्ये तो पिझ्झा ऑर्डर देताना दिसत आहे. त्यांच्यासोबत एक पिझ्झा बॉक्स देखील दिसतो. डिलिव्हरी बॉयच्या लूकमधील त्याच्या वेगवेगळ्या पोझमधील फोटो दिसत आहेत. हे वाचा -  घराच्या भिंतीत युवकाला आढळलं असं काही की पाहूनच उडाला थरकाप, पोलीस तपासात समोर आलं सत्य सिद्धार्थ पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनला सिद्धार्थ शुक्लाचे हे जुने फोटो सोशल मीडिया साईट ट्विटरवर तसेच इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. सिद्धार्थचे फॅन पेज हे फोटो शेअर करत आहे. अनेक चाहते त्याच्या या लूकचे कौतुकही करत आहेत.

बरेच लोक असे म्हणत आहेत की प्रत्येकाला या माचो माणसाकडून पिझ्झा घ्यायला आवडेल. तसेच अनेकांनी या फोटोवरून सिद्धार्थच्या स्मृती जाग्या केल्या आणि ते इमोशनल झाले. हे वाचा -  थेट पार्टीसाठी गाठली मुंबई, पण अडकल्या NCBच्या जाळ्यात, कोण आहेत ‘या’ दोन तरुणी? Video आला समोर

दरम्यान, 2 सप्टेंबर रोजी वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. कोणताही आजार, लक्षणं नसताना सिद्धार्थचा अचानक हार्ट अटॅकच्या कारणाने मृत्यू झाल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातून (Sushant Singh Rajput Death Case) धडा घेत मुंबई पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टमची व्हिडीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. सिद्धार्थवर ब्रह्मकुमारी परंपरेनुसार (Sidharth Shukla Funeral Brahmakumari Rituals) अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थचा अध्यात्मावर विश्वास होता, याच कारणामुळे तो दीर्घकाळापासून ब्रह्मकुमारी संस्थानाशी जोडलेला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात