नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचं निधन झालं आहे.
मनोज वाजपेयी यांचे वडील राधाकांत (Radhakant Bajpayee) वाजपेयी यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 85 वर्षीय राधाकांत वाजपेयी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Manoj Bajpayee Father death)
वडील आजारी असल्याची बातमी कळताच मनोज वाजपेयी यांनी केरळमध्ये सुरु असलेलं फिल्मचं शूटिंग सोडून दिल्ली गाठली होती. अभिनेते मनोज यांचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं. मनोज वाजपेयीच्या वडिलांच्या निधनाची बातमी 'SHE' चे संचालक अविनाश दास यांनी या वृत्ताला दुजोरा देत ट्विट केलं आहे.
अविनाश दास यांनी एका फोटोसह एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, मनोज भैय्याचे वडील आता नाहीत. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आता आठवत आहेत. मी हा फोटो भितिहरवा आश्रमात काढला होता. ते महान सहनशक्तीचा असलेलं व्यक्तीमत्त्व होतं. नेहमी स्वतःला मुलाच्या ऐश्वर्याच्या स्पर्शापासून दूर ठेवले. माफक विणकाम करणारे ते मोठे व्यक्ती होते. अभिवादन श्रद्धांजली.
हेही वाचा- शाहरुखचा मुलगा आर्यन खान NCB च्या ताब्यात, समोर आला पहिला Inside Video
राधाकांत वाजपेयी यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर बॉलिवूड आणि अभिनेत्याचे मूळ गाव असलेल्या गौनाहा खंडाच्या बेलव्यात शोककळा पसरली आहे. गावातील लोकं सांगतात की, ते अत्यंत दयाळू होते. तसंच ते नेहमी गरीबांना मदत करायचे. गेले कित्येक महिने त्यांची प्रकृती खूपच खराब होती. अलीकडेच त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
राधाकांत यांना तीन मुलं आहेत, ज्यात सर्वात मोठा मुलगा अभिनेते मनोज वाजपेयी आहे. मनोज यांच्या वडिलांनी त्यांना पश्चिम चंपारणमधील एका छोट्याशा खेडे गावातून मुंबईला पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे.
हेही वाचा- पार्टीसाठी गाठली मुंबई, पण अडकल्या NCBच्या जाळ्यात, पाहा कोण आहेत या दोन तरुणी?
ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत मनोज वाजपेयी यांनी सांगितलं होतं की, त्यांचे वडील त्यांना नेहमी त्यांचा अभ्यास आधी पूर्ण करण्याचा सल्ला द्यायचे. वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेता बिहारमधील एका गावातून दिल्लीला आला आणि नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी हे त्यांच्या वडिलांसाठी केलं. कारण हे त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं.
अभिनेत्यानं या मुलाखतीत पुढे सांगितलं की, मी माझं शिक्षण सोडावं अशी त्याची इच्छा नव्हती. मला त्यांची स्वप्नं पूर्ण करायची होती आणि कसा तरी मी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पदवी मिळवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Manoj Bajpayee