ठाणे, 5 एप्रिल : रोशनी शिंदे यांना ऑफिसमधून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्या हात जोडून माफी मागत असताना तिचा व्हिडीओ शूट केला. मात्र, मारहाण थांबवली नाही, मोगलाई राज्यात आहे, अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये ठाण्यात जोरदार राडा झाला आहे. ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या प्रकरणानंतर महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी ठाण्यात लढेल आणि जिंकून दाखवेल असं थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे? गद्दारांच्या सरकारबद्दल लोकामध्ये राग आहे. आज मोर्चासाठी येताना गाडीची काच खाली केली असता बस, फुटपाथवरील सगळे लोक आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांहत होते. मोर्चा काढायचा असेल तर 17 अटी दिल्या आहेत. मी तर म्हणतो सर्वांवर केसेस टाका. आयुक्त कार्यालयासाठी टाळा आणला आहे. कारण, ज्यावेळी आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आयुक्तालयात गेलो तेव्हा कमिशनर पळून गेले असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. तो पक्षच नाही, चोरांचा पक्ष असूच शकत नाही, त्यांची टोळी असू शकते. वाचा - Thane MVA Morcha : ‘आज सांगतोय..’, ठाण्यात आदित्य ठाकरे कडाडले, मुख्यमंत्र्यांना थेट इशारा शिंदे ताईंना मारलं, महिलांना मारलं जातं. कशासाठी एक पोस्ट टाकलं म्हणून? राज्यात मोगलाई माजली आहे. कमिशनर वर्षा बंगल्यावर असतात. हे काही तासांच सरकार आहे. आयपीएस, आयएएस जे गद्दार गँगमधील असतील सरकार आल्यावर त्यांची चौकशी करणार आणि जेल भरो आंदोलन करणार. हिच शपथ घेण्यासाठी शक्ती स्थळी आलो असल्याचे आदित्य म्हणाले. ठाण्यातून लढून जिंकूल दाखवणार आहे. मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच स्वागत करायला आलो. ठाण्याला एका दिवसात इतकं बदमान केलं? त्यांचा माफीचा व्हिडिओ बनवून घेतला. दोन रुपयांसाठी आम्हाला ट्रोल करतात. जे ठाणे जगात प्रसिद्ध होते, एका दिवसात दाखवलं महिला देखील सुरक्षित नाही. उलट तिच्यावरच गुन्हा दाखल होता. माजी महापौर देखील गद्दारांच्या टोळीत आहेत. गेल्या काही महिन्यात सुप्रिया सुळे यांना शिव्या दिल्या गेल्या. त्यांची हकालपट्टी करायला हवी होती. मात्र, साधी माफी देखील मागितली नाही. आपल्याच काय 66 देशात असे सरकार नसेल. मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यासाठी आरतीची थाळी घेऊन यायला विसरलो. भाजप हा जगातला मोठा पक्ष, भाजपात प्रवेश केला तर ईडी, सीबीआय येणार नाही.