माथेफिरू तरुणाचा शिवडी रेल्वे स्थानकावर धिंगाणा, चाकूने केला पोलिसांवर हल्ला

मोठ्या शिताफीने पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतलं आणि रेल्वे स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये बंद केलं. पण दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या या तरुणाने...

मोठ्या शिताफीने पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतलं आणि रेल्वे स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये बंद केलं. पण दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या या तरुणाने...

  • Share this:
मुंबई, 15 फेब्रुवारी : मुंबईतील (Mumbai) शिवडी रेल्वे स्थानकात (shivadi railway station) दारू पिऊन एका माथेफिरूने धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. या माथेफिरू तरुणाने रेल्वे पोलिसांवर चाकू हल्ला केला. तसंच  रेल्वे स्टेशन मास्टरच्या ऑफिसची सुद्धा तोडफोड केली. शिवडी रेल्वे स्थानकात आज सकाळी ही घटना घडली. एका माथेफिरू तरुण अचानक धारधार चाकू घेऊन स्टेशनच्या आवारात फिरत होता. हा तरुण दारूच्या नशेत तर्रर्र होता. त्यावेली रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी या तरुणाला अडवलं. पण या तरुणाने पोलिसांवरच हल्ला केला. बऱ्याच वेळ पोलीस आणि तरुणामध्ये झटापट सुरू होती. PHOTO: Happy Birthday रणधीर कपूर; अर्ध्या रात्री काकांसाठी केलं पार्टीचं आयोजन अखेर मोठ्या शिताफीने पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतलं आणि रेल्वे स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये बंद केलं. पण दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या या तरुणाने रेल्वे मास्टरच्या केबिनची तोडफोड केली, यात तो स्वत:ही जखमी झाला आहे. त्यामुळे शिवडी रेल्वे स्थानकात तणावाचं वातारण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी या माथेफिरू तरुणाला अटक केली आहे. या तरुणाने आपल्याला आणखी दारू न मिळाल्यामुळे हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून पुढील तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published: