नवी मुंबई, 10 ऑगस्ट: नवी मुंबईत (Navi Mumbai) पोटच्या मुलीनंच स्वतःच्या आईची (Mother) गळा आवळून हत्या (murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील ऐरोली (airoli) सेक्टर 7 मध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी मुलीचं वय केवळ 15 वर्ष आहे. आरोपी मुलगी अल्पवयीन असून ती नुकतची दहावी पास झाली आहे. मुलीनं 30 जुलै रोजी आपल्या आईची हत्या केली असल्याचं समजतंय. शिल्पा जाधव असं मृत आईचं नाव असून ऐरोलीतील सेक्टर 7 मधील राकेश सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. आपल्या मुलीनं डॉक्टर बनावं अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती. सीईटीमध्ये चांगले मार्क मिळावे म्हणून तिच्यासाठी क्लास देखील लावण्यात आले होते. मात्र मुलगी अभ्यास करत नसल्यानं मुलीची आई तिच्यामागे सारखी तगादा लावत होती. मनाला चटका लावणारी बातमी…म्हणून या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूची चर्चा गावभर 27 जुलै रोजी भांडण झाल्यानं आरोपी मुलगी ऐरोलीतील मामाच्या घरी गेली होती. त्यानंतर आईनं तिला समजावून घरी आणलं. त्यानंतर पुन्हा अभ्यासावरुन 30 जुलैला भांडण झालं. यावेळी आईनं मुलीला मारहाण केली आणि तिला घाबरवण्यासाठी हातात चाकू घेतला होता. मुलगी जोराचा प्रतिकार करते म्हणून आईने तिच्या हाताचा चावा घेतला. यावेळी मुलीने आईला जोरात ढकलून दिल्याने ती खाटेवर पडली आणि आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच दरम्यान आईनं बेडवर पडलेला मुलीचा कराटे बेल्ट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आई प्रयत्न करत असताना मुलीने तोच बेल्ट घेत आईचा गळा आवळला. गंभीर दुखापत झाल्याने आई अर्धमेली अवस्थेत असल्याने मुलीने करकचून बेल्ट गळ्याला आवळून आईची हत्या केली. त्याहून धक्कादायक म्हणजे ही आत्महत्या दिसावी यासाठी मुलीने आईच्या मोबाईलमधून वडील, मामा यांना मेसेज केला. मुलगी आपले काहीच ऐकत नसून मी स्वताला संपवून घेईन. यानंतर बेडरूमचा दरवाजा बंद करून इंटरलॉकची चावी मुलीनं आतमध्ये ठेवली. मुलीच्या मामानं येऊन बेडरूमचा दरवाजा तोडला असता सदर प्रकार समोर आला. पोलिसांनी पोस्टमार्टम केला असता डोक्याला झालेली दुखापत आणि गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. मॉल, हॉटेलच्या निर्बंधात शिथिलता?, काय ठरलं टास्क फोर्सच्या बैठकीत पोलिसांना संशय आल्यानं कुटूंबातील सर्वांची चौकशी केली. तसंच मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने केलेल्या हत्येची कबूली दिली. मुलगी अल्पवयीन असल्याने आणि तिची मानसिक परिस्थिती ठिक नसल्यानं तिला अद्याप अटक करण्यात आलेले नाही. त्यामुळे आज किंवा उद्या मुलीला अटक होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.