मुंबई, 10 ऑगस्ट: सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची टास्क फोर्स (Task Force)सोबतची बैठक पार पडली. या बैठकीत धार्मिकस्थळं, रेस्टॉरंट, मॉल (Mall) उघडण्याबाबत सखोल चर्चा झाली. या बैठकीनंतर मॉल धार्मिकस्थळं, रेस्टॉरंट आणि मॉल यांना लागू असलेले निर्बंध शिथिल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र यावर या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला नाही. तसंच गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी सणांचं साधं रुप असेल असंही या बैठकीत (Meeting) ठरवण्यात आलं आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरही (Third Wave) चर्चा करण्यात आली. यावेळी ऑक्सिजनची उपल्बधता तसेच लसीकरणावर या बैठकीत चर्चा झाली. टास्क फोर्सच्या बैठकीत संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली असून येणाऱ्या काळात आणखीही काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून कशा प्रकारे निर्बंधात शिथिलता आणायची यावर देखील या टास्क फोर्सकडून सांगण्यात आलं. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर जम्मू -काश्मीरमध्ये ड्रोन हल्ला? टास्क फोर्सच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे हॉटेल- रेस्टॉरंट आणि मॉल खुले करण्यासंदर्भात चर्चा हॉटेल-रेस्टॉरंट -मॉल टप्प्याटप्यानं यासाठी शिथिलता देण्याबाबत विचार हॉटेल - रेस्टॉरंटला रात्री 10 पर्यंत शिथीलता देता येऊ शकेल. यासाठी काटेकोर नियमावली तयार होणार मॉल खुले झाल्यास काटेकोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळे, सामाजिक कार्यक्रम यात लगेचच शिथीलता देणं शक्य नाही. पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉक्टर झहीर विराणी, डॉक्टर राहुल पंडित, वसंत नागवेकर, डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर अजित देसाई, ओम श्रीवास्तव, डॉक्टर उदवाडिया,अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास हे उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







