• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मोठी बातमी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करणार!

मोठी बातमी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करणार!

शालेय शिक्षण विभागाने कोरोना परिस्थितीमुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:
मुंबई, 07 एप्रिल: राज्यात कोरोनाची (Corona) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पण, आता नववी (9th Exam) आणि अकरावीच्या (11th Exam) विद्यार्थ्यांना सुद्धा सरसकट पास करण्यात येईल, याबद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने कोरोना परिस्थितीमुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थींना सरसकट उत्तीर्ण करणार आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाचा निर्णय घेणार आहे. विदर्भात तापमान चाळीशी पार, तर कोकणासहित मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण परंतु, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे.  या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक - दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. 3 एप्रिल रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून घोषणा केला होती. राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इ. 1 ली ते इ. 8 वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करीत आहेत मात्र संकलित मूल्यमापन करता आले नाही. या स्थितीत शैक्षणिक वर्ष 2020- 21 मधील कोविड 19 ची अपवादात्मक परिस्थिती पाहता  इ. 1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं. दिल्लीतल्या डॉक्टरांचं धक्कादायक निरीक्षण; लहान मुलांना लक्ष्य करतोय नवा कोरोना तसंच, 'इयत्ता  1 ली ते 8 वी च्या सर्व विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थात SCERT, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील.  कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. 1 ली ते इ. 8 वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्याचप्रमाणे इ. 9 वी आणि इ. 11 वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं संकेतही त्यावेळी गायकवाड यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हा निर्णय जाहीर केला जाणार आहे.
Published by:sachin Salve
First published: