नवी दिल्ली, 7 एप्रिल : केवळ मुंबई (Mumbai), महाराष्ट्रातच (Maharashtra Corona updates) नाही तर देशातील विविध राज्यांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव खूपच वेगाने होत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रासह गुजरात (Gujarat), पंजाब (Punjab), दिल्ली **(Delhi)**मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग (Coronavirus spread) मोठ्या प्रमाणात होत आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी 24 तासांत 5100 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. याच दरम्यान दिल्ली सरकारने शहरात 30 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. दिल्लीतील प्रसिद्ध लोकनायक जय प्रकाश रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोनाचा संसर्ग प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना होतो, असं आतापर्यंत लक्षात आलं होतं. पण आता या नव्या लाटेत कोरोनाचा विषाणू प्रामुख्याने लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांना लक्ष्य करत असल्याचं त्यांनी नोंदवलं आहे. लोकनायक जय प्रकाश रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश कुमार (एमडी, लोकनायक रुग्णालय, दिल्ली) यांनी सांगितले की, कोरोनाची ही लाट गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच वेगवान आहे. गेल्या आठवड्यात लोकनायक रुग्णालयात केवळ 20 बाधित दाखल झाले होते. मात्र, सध्यस्थितीत रुग्णालयात 170 रुग्ण दाखल आहेत. अशा परिस्थितीत बेड्सची संख्या वाढवणे आवश्यक आहे.
We have noticed, patients who were earlier infected with #COVID19 were mostly elderly people, now the patients are mostly youngsters, children & pregnant women. All arrangements are in place at our hospital so that we can treat patients: Dr. Suresh Kumar
— ANI (@ANI) April 7, 2021
हे पण पाहा: PHOTOS: लसीकरण जागरूकतेसाठी संजीवनी उपक्रमला सुरुवात; सोनू सूदने लावली हजेरी 130 दिवसांनंतर दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी 5,100 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 27 नोव्हेंबरनंतरही ही सर्वाधिक नोंद आहे. 27 नोव्हेंबर रोजी 5,482 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. विशेष बाब म्हणजे दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक नमुने तपासण्यात आले आहेत. तपासणी केली असता असे समोर आले की, कोरोनाचा संसर्ग दर हा पाच टक्क्यांवरुन 4.93 टक्क्यांपर्यंत घसरला. मात्र, गेल्या सहा दिवसांत 22,632 बाधितांची संख्या वाढली आहे. हे पण वाचा: कोव्हिडबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय, कारमध्ये एकटे असाल तरी मास्क अनिवार्य दिल्लीतील रिकव्हरी रेट घसरतोय यामुळे दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या ही 17 हजारांहून अधिक झाली आहे. 24 तासांत 2340 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचवेळी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या सहा दिवसांत 86 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आतापर्यंत 6 लाख 85 हजार 62 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी आतापर्यंत 6 लाख 56 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने रिकव्हरी रेट 96.22 वरुन 95.84 टक्के इतका झाला आहे.