Home /News /maharashtra /

तिसऱ्या लाटेआधी पालकांसाठी धोक्याची घंटा! 25 दिवसांतच राज्यात 4,500 मुलं कोरोनाच्या विळख्यात

तिसऱ्या लाटेआधी पालकांसाठी धोक्याची घंटा! 25 दिवसांतच राज्यात 4,500 मुलं कोरोनाच्या विळख्यात

चिमुकले कोरोनाच्या विळख्यात.

चिमुकले कोरोनाच्या विळख्यात.

राज्यातील कोविड पॉझिटिव्ह मुलांची धक्कादायक आकडेवारी.

मुंबई, 26 ऑगस्ट : कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) नियंत्रणात आल्यानंत आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona third wave) धास्ती वाटू लागली आहे. राज्य सरकारनेही (Maharashtra coronavirus) तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. ही लाट किती भयंकर असेल हे अद्याप तरी स्पष्ट नसलं तरी या लाटेआधीच भयंकर चित्र समोर आलं आहे. राज्यात अवघ्या 25 दिवसांत 4,500 पेक्षा जास्त मुलं कोरोनाच्या विळख्यात (Corona positive children) सापडली आहेत (Coronavirus in children). राज्यात आज एका दिवसात 163 कोरोना पॉझिटिव्ह मुलं आढळली आहे (Corona infected children). तर मागील 25 दिवसांत 10 वर्षांखालील 4,500 पेक्षा जास्त मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे (Children corona cases). मुंबईतील कोविड बाधित मुलांचं प्रमाण एकूण बाधितांच्या 9 टक्के इतकं आहे. मुंबईत एका वसतीगृहात एकाच दिवशी 15 मुलं कोविड बाधित आढळलीत. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 15 दिवसांत 365 मुलं बाधित झाली आहेत.  यामध्ये 0 ते 5 वयोगटातील 58, 6 ते 10 वयोगटातील 76, 11 ते 15 वयोगटातील 128 आणि 16 ते 18 वयोगटातील 103 मुलांचा समावेश आहे. मुंबईतील पालिका रुग्णालयात सध्या 30 मुलं भरती आहेत. हे वाचा - कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणार पण...; मोदी सरकारचा मोठा निर्णय बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप राऊत यांनी सांगितलं, "आम्ही गरज असेल तर कोरोना पॉझिटिव्ह मुलांच्या आईवडिलांनाही त्यांच्यासोबत ठेवतो. पालकांना कोरोना नसेल आणि मुलासोबत राहण्यासाठी त्यांची तयारी असेल तर आम्ही तसं करतो" तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात कोविडशी मुकाबला करण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे मुंबईसह अनेक शहरात लहान मुलांचे कोविड बालरोग विभाग तयार केले जात आहेत. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई यांनी सांगितलं की, "मुंबईत 1460 ऑक्सिजनयुक्त बेड, 227 आयसीयू, 33 एनआयसीयूची तयारी महापालिकेने केली आहे. किती बेड वापरात आणले जावे हे लहान मुलांच्या बाधित होण्याच्या प्रमाणावर अवलंबून आहे." हे वाचा - कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणार पण...; मोदी सरकारचा मोठा निर्णय लहान मुलांच्या कोरोना संसर्गाचा हा आकडा पाहिला की धडकीच भरते पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  मुलांच्या कोरोना संसर्गाची टक्केवारी 8 टक्के आहे आणि मृत्यूचं प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलं आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Corona patient, Coronavirus

पुढील बातम्या