मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल 606 कोटी शिल्लक, 25 टक्केच निधी वापरला!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल 606 कोटी शिल्लक, 25 टक्केच निधी वापरला!

 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचीही तारांबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचीही तारांबळ

आतापर्यंत एकूण 798 कोटी रक्कम जमा झाली असून आजमितीस 606 कोटी रक्कम शिल्लक आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर :  कोरोना (corona) परिस्थिती लढा देत असताना राज्य सरकारला आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागला. कोरोनावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (Chief Ministers Relief Fund) मदतीचे आवाहन करण्यात आले होते. आतापर्यंत 799 कोटी रक्कम जमा झाली असून 606 कोटींचा निधी वापराविना शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. यातील फक्त 25 टक्के निधी वापरण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे एकूण जमा निधी, खर्च करण्यात आलेला निधी आणि शिल्लक निधी याची माहिती विचारली होती.

याबद्दल मुख्यमंत्री सचिवालयाने आतापर्यंत किती निधी जमा झाला आणि किती वापरण्यात आला याबद्दल माहिती दिली आहे. आतापर्यंत एकूण 798 कोटी रक्कम जमा झाली असून आजमितीस 606 कोटी रक्कम शिल्लक आहे. 192 कोटीचे वाटप केले आहे. 192 कोटीचे वाटप लक्षात घेता एकूण 25 टक्के रक्कम ही जमा निधीतून खर्च करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई हायकोर्टात युक्तीवाद, तोडगा निघाला का?

अनिल गलगली यांच्या मते हा निधी फक्त कोविड प्रयोजनासाठी असल्याने आतापर्यंत खर्च शत प्रतिशत करणे आवश्यक होते. पण शासनाने 25 टक्के निधीचे वाटप केले आहे. इतका 606 कोटींचा निधी राखीव ठेवण्याचे नेमके प्रयोजन काय आहे? याची माहिती जनतेस देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही गलगलींनी केली आहे.

बायकोला दिली प्रेमाची अनोखी निशाणी; PHOTOS पाहून म्हणाल 'वाह ताज'!

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19  खात्यात देणगीदारांच्या मदतीने 541.18 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात फक्त 132.25 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. 3 ऑगस्ट 2020 पर्यंत एकूण 541.18 कोटी रुपये जमा झाले होते. या रक्कमेपैकी फक्त 132.25 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आले होते. खर्च झालेल्या रक्कमेपैकी 20 कोटी रुपये सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबईला देण्यात आले असून 3.82 कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला देण्यात आले होते.

First published: