मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय; महिलेनं भररस्त्यात केलेल्या भयानक कृत्यानं नगर हादरलं!

सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय; महिलेनं भररस्त्यात केलेल्या भयानक कृत्यानं नगर हादरलं!

Murder in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं भररस्त्यात आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या (daughter in law killed father in law) केली आहे.

  • Published by:  News18 Desk
अहमदनगर, 24 नोव्हेंबर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं भररस्त्यात आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या (daughter in law killed father in law) केली आहे. सुनेनं कुऱ्हाडीनं वार (Attack with ax) करत सासऱ्याचं डोकं दगडानं ठेचलं (Crushed head with stone) आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यावेळी पोलिसांनी आरोपी सुनेला देखील अटक (Accused daughter in law arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अर्जुन गोविंद हजारे असं हत्या झालेल्या 63 वर्षीय सासऱ्याचं नाव असून ते जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील गावातील रहिवासी होते. या प्रकरणी पोलिसांनी सून ज्योती अतुल हजारे हिला अटक केली असून तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सासरा अर्जुन हजारे हे आपल्या सुनेच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असत. त्यामुळे सासरच्या मंडळींसोबत आरोपी ज्योती हिचे वारंवार खटके उडत होते. हेही वाचा- एक घाव अन् खेळ खल्लास; नांदेडात पोटच्या लेकानं जन्मदात्याला दिला भयावह मृत्यू, धक्कादायक कारण समोर घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी देखील दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. सासऱ्यानं सुनेवर चारित्र्याचा संशय घेतल्याने दोघंही गावातील रस्त्यावर एकमेंकासोबत भांडत होते. भररस्त्यावर सुरू असलेल्या या वादातून संतापलेल्या सुनेनं सासऱ्यावर थेट कुऱ्हाडीनं वार केले आहेत. आरोपी सून एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने रस्त्याच्या बाजूला पडलेल्या दगडाने आपल्या सासऱ्याच्या तोंडावर, डोक्यात आणि कपाळावर एका पाठोपाठ एक घाव घातले आहेत. हेही वाचा-वडिलांचं अफेअर नाही पटलं, मुलगा आणि मुलीने केला महिलेचा खून हा हल्ला इतका भयावह होता की सासरे अर्जुन हजारे हे घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि काही वेळातच त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, आरोपी सुनेला घटनास्थळावरूनच अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Murder

पुढील बातम्या