Home /News /maharashtra /

Latur: खाजगी क्लासला आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला बनवलं वासनेचं शिकार; शिक्षकाचं धक्कादायक कृत्य

Latur: खाजगी क्लासला आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला बनवलं वासनेचं शिकार; शिक्षकाचं धक्कादायक कृत्य

Rape on Minor Girl in Latur: लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

    लातूर, 02 जानेवारी: लातूर (Latur) शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षकाने खाजगी क्लासला येणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं (Teacher raped minor girl) आहे. पीडित मुलगी शिकवणीसाठी आली असता, नराधम आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused teacher arrested) असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. किशोर मामडगे असं अटक केलेल्या क्लास चालकाचं नाव असून तो शहरातील ट्युशन एरिया भागात इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे क्लास घेतो. आरोपी मामडगे याने 26 डिसेंबर रोजी क्लासला येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हेही वाचा-31 डिसेंबरची रात्र ठरली काळरात्र; पार्टीनंतर चौघांनी मित्राला टेरेसवरून फेकलं पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी 26 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे मामडगे याच्या खाजगी शिकवणीला गेली होती. यावेळी आरोपीनं पीडित मुलीवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीनं घरी येऊन संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला. हेही वाचा-आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत; नाशकातील खळबळजनक घटना यानंतर पीडित मुलीच्या आईनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी किशोर मामडगे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद आढळतंय का? याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Latur, Rape on minor

    पुढील बातम्या