जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / भायखळा जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट, इंद्राणी मुखर्जीसह 38 महिला कैदी बाधित

भायखळा जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट, इंद्राणी मुखर्जीसह 38 महिला कैदी बाधित

भायखळा जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट, इंद्राणी मुखर्जीसह 38 महिला कैदी बाधित

भायखळा तुरुंगात एकाच दिवसात 38 महिला कैदी कोरोनाबाधित (Corona Patients in Byculla jail) झाल्याचं आढळून आलं आहे. यात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही (Indrani Mukerjea) कोरोनाची लागण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 21 एप्रिल : देशात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा रोज एक नवा उच्चांक समोर येत आहे. यासोबतच मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं चित्र आहे. कोरोनानं आता तुरुंगातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भायखळा तुरुंगातही (Byculla jail) आता कोरोनाचा विस्फोट झाल्याचं समोर आलं आहे. या तुरुंगात एकाच दिवसात 38 महिला कैदी कोरोनाबाधित (Corona Patients in Byculla jail) झाल्याचं आढळून आलं आहे. यात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही (Indrani Mukerjea) कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांवर ऑक्सिजन सिलेंडर चोरण्याची वेळ, विदारक VIDEO आला समोर एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर तुरुंगातील कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचंही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे, तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. याआधीही कोल्हापूर कारागृहात 10 दिवसांपूर्वी एकाच वेळी 28 कोरोना रुग्ण आढळले होते. पनवेलमधील वृद्धाश्रमात धक्कादायक प्रकार! एकाच वेळी 58 जणांचा कोरोनाची लागण राज्यातील कोरोना स्थिती - महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांसोबतच मृतकांचा आकडाही वाढत (Covid patients death number increase) आहे. गेल्या 5 दिवसांत राज्यात तब्बल 2190 कोरोना बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात 62,097 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर तब्बल 519 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, मंगळवारी देशात 2020 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात