Home /News /nashik /

पांढराशुभ्र शर्ट घालून रुबाबात कारमधून उतरायचे अन्...; मंगळसूत्र हिसकावणारी गुजरातची हाय प्रोफाइल टोळी जेरबंद

पांढराशुभ्र शर्ट घालून रुबाबात कारमधून उतरायचे अन्...; मंगळसूत्र हिसकावणारी गुजरातची हाय प्रोफाइल टोळी जेरबंद

Chain Snatching in Nashik: नाशिकमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारी हाय प्रोफाइल टोळीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    नाशिक, 12 ऑक्टोबर: नाशिकमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणारी हाय प्रोफाइल टोळीला अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे ही टोळी गुजरातमधील असून चार चाकी गाडीतून येत गुन्हा करायचे आणि काही काळासाठी गायब व्हायचे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या टोळीला अखेर पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार भामट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हस्तगत केलं आहे. जयसिंग यादव (वय-25), कुलदीप यादव (वय-20), संदीप यादव (वय-28) आणि पंकज यादव (वय-20) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित अटक केलेले सर्व आरोपी गुजरातमधील बलसाड जिल्ह्यातील सिल्व्हासा येथील रहिवासी आहेत. आरोपींकडून पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असून त्यांनी अशाप्रकारे किती गुन्हे केले आहेत, याचा तपास केला जात आहे. हेही वाचा-'या' फार्मास्यूटिकल कंपनीत 142 कोटींची कॅश; पुस्तकांच्या कपाटात कोंबल्या नोटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय महिला सुमन सोमवंशी या आपल्या नातवाला शिंदे नगर येथील मखमलाबाद रोडवरील कोचिंग क्लासमध्ये सोडवायला गेल्या होत्या. नातवाला कोचिंग क्लासमध्ये सोडल्यानंतर सुमन सोमवंशी एकट्या परत आपल्या घराकडे येत होत्या. दरम्यान कोचिंग क्लासपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या कारमधून एक उंचपुरा आणि पांढराशुभ्र शर्ट घातलेला व्यक्ती बाहेर पडला. हेही वाचा-बायकोसोबत नवऱ्याचं राक्षसी कृत्य; पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून दिला भयंकर मृत्यू काही कळायच्या त्याने सुमन यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचं मंगळसूत्र ओढलं. मात्र त्याचा हा प्रयत्न फसल्याने तो टोळीसह चारचाकी गाडीतून घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी सुमन सोमवंशी यांनी तातडीने पंचवटी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेत घटनास्थळी दाखल झाले. येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भामटे कैद झाले होते. यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने विठ्ठल रुक्मिणी मंगलकार्यालयापासून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nashik

    पुढील बातम्या