मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Big Good News! मुंबईत 30 हजार बेड अन् रुग्ण फक्त 500 खाटांवर

Big Good News! मुंबईत 30 हजार बेड अन् रुग्ण फक्त 500 खाटांवर

सध्या मुंबईत 2255 सक्रिय रुग्ण असून यातील केवळ पाचशे रुग्ण मुंबईतील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सध्या मुंबईत 2255 सक्रिय रुग्ण असून यातील केवळ पाचशे रुग्ण मुंबईतील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Corona Virus In Mumbai: सध्या मुंबईत 2255 सक्रिय रुग्ण (Active corona cases in mumbai) असून यातील केवळ पाचशे रुग्ण मुंबईतील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

    मुंबई, 27 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत (Corona cases in Mumbai) मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यानं कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेवर (Corona virus 3rd wave) पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. सध्या मुंबईत 2255 सक्रिय रुग्ण (Active corona cases in mumbai) असून यातील केवळ पाचशे रुग्ण मुंबईतील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील तब्बल 29,500 बेड रिकामे (29500 beds empty) असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेल्या 30 हजार खाटांपैकी केवळ 500 खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर सक्रिय रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्णांना कोविड विषाणूची सौम्य लक्षणं असल्यानं त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. मुंबईत कोरोना स्थिती सध्या चांगलीच आटोक्यात आली असल्यानं हजारो बेड रिक्त राहत असल्याचं पालिका प्रशासनाकडून नुकतच सांगण्यात आलं आहे. सद्यस्थितीत बेड रिकामे असले तरी कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन पालिका सज्ज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. हेही वाचा-तिसऱ्या लाटेआधी पालकांसाठी धोक्याची घंटा! 25 दिवसांत राज्यात 4500 मुलांना कोरोना कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत बिकट परिस्थिती झालेल्या मुंबई शहरात सध्या कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांचा दर 0.04 टक्क्यांवर गेला आहे. असं असलं तरी प्रशासनानं तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहिसर, मालाड, गोरेगाव नेस्को, बीकेसी कुर्ला, एनएससीआय वरळी, मुलुंड अशी सहा जम्बो कोविड सेंटर सज्ज ठेवली आहेत. याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्स, कांजूरमार्ग, सोमय्या मैदान या ठिकाणीही जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हेही वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी खरी ठरणार? 'या' जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सध्या मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात 370 रुग्ण उपचार घेत आहेत. तर बीकेसीत 8, मुलुंड 38 (1650 बेड), नेस्को फेज - एकमध्ये 16 (2215 बेड), फेज दोनमध्ये 2 (1500) एनएससीआय 35 (550 बेड) असे रुग्ण उपचार घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona patient, Mumbai

    पुढील बातम्या