• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Mumbai News: आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्...; 28 वर्षीय आरोपीला अटक

Mumbai News: आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्...; 28 वर्षीय आरोपीला अटक

Crime in Mumbai: घराजवळ राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणानं एका चार वर्षांच्या चिमुकलीला (Rape on minor girl) आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 जुलै: घराजवळ राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणानं एका चार वर्षांच्या चिमुकलीला (Rape on minor girl) आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणानं पीडित मुलीला आइसक्रीम देण्याचा बहाणा (Lure of giving ice-cream) करत तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह (POCSO) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. चार वर्षांची पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. दरम्यान 28 वर्षीय आरोपी पीडित मुलीला एकटं खेळताना पाहून तिच्याजवळ आला. चिमुरडीला आइसक्रीम देण्याचा बहाणा करत तिला तेथून आडबाजूला घेऊन गेला. याठिकाणी कोणी बघत नसल्याचं पाहून आरोपीनं चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. हेही वाचा-प्रेमासाठी कायपण! दीड वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या सैराट कपलला अखेर अटक पीडित मुलगी पुन्हा घरी आल्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईनं मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात 28 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची गांभीर्यानं दखल देत साकीनाका पोलीसांनी अवघ्या काही तासांतचं आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून पुरावे गोळा केले जात आहेत. तसेच पीडितेच्या आईचा जबाब देखील नोंदवून घेण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास साकीनाका पोलीस करत आहेत. हेही वाचा-नात्याला काळिमा! शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना कुरकुरे देण्याच्या बहाण्यानं पुण्यात चिमुकलीवर अत्याचार काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका बिहारी मजुरानं कुरकुरे देण्याचा बहाणा करत चार वर्षाच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं होतं. पीडितेच्या आईनं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 30 वर्षीय बिहारी मजुराला अटक केली होती.
  Published by:News18 Desk
  First published: