• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • नात्याला काळिमा! शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना

नात्याला काळिमा! शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना

Rape in Beed: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भांवानी बलात्कार (Cousin Raped Minor Sister) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  बीड, 18 जुलै: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर (Minor school girl) तिच्याच चुलत भांवानी (2 Cousin) बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपींनी बलात्काराची माहिती कोणालाही न सांगण्याची धमकी देत तिच्यावर वारंवर बलात्कार केला आहे. दोघांनी केलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पीडितेनं बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही चुलत भावांविरुद्ध गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक (both Arrest) केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित शाळकरी मुलगी पंधरा वर्षांची असून ती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील वस्तीवर राहते. तर दोन्ही आरोपी हे पीडित मुलीचे चुलत भाऊ असून तेही अल्पवयीन आहेत. आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून पीडितेला धमकी देत तिचं लैंगिक शोषण करत होते. दरम्यानच्या काळात आरोपींनी तिच्यावर अनेकवेळा बळजबरी केली आहे. यातूनच पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं आहे. हेही वाचा-मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्... ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीनं आपल्या कुटुंबीयांसोबत जाऊन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही भावांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपी चुलत भावांविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित दोन्ही आरोपी भावांना अटक केली असून त्यांना विधिसंघर्षग्रस्त बालक म्हणून बाल न्याय मंडळासमोर हजर केलं जाणार आहे. हेही वाचा-हेडफोनवरून झाला वाद, भावाने बहिणीचा केला खून, अकोला हादरलं बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात महिला अधिकारी नसल्यानं या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: