मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई क्राइम ब्रांचची मोठी कारवाई; 24 किलो चरससह चौघे जेरबंद, 2 महिलांचा समावेश

मुंबई क्राइम ब्रांचची मोठी कारवाई; 24 किलो चरससह चौघे जेरबंद, 2 महिलांचा समावेश

मुंबई क्राइम ब्रांचने दहिसर चेक नाक्याजवळ मोठी कारवाई करत 24 किलो चरस जप्त केलं आहे. (File Photo)

मुंबई क्राइम ब्रांचने दहिसर चेक नाक्याजवळ मोठी कारवाई करत 24 किलो चरस जप्त केलं आहे. (File Photo)

मुंबई क्राइम ब्रांचने दहिसर चेक नाक्याजवळ (Dahisar checkpoint) मोठी कारवाई करत 24 किलो चरस जप्त केलं (24 KG Charas seized) आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 26 ऑक्टोबर: गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली होती. पोलिसांनी एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक करत तिच्याकडून तब्बल 7 किलो हिरोइन जप्त करण्यात (seized 7 KG heroin) केलं होतं. पोलिसांनी जप्त केलेल्या हिरोइनची बाजारातील किंमत तब्बल 21 करोड इतकी होती. संबंधित ड्रग्स तस्करी प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानातील प्रतापगढशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असताना आता राजस्थानशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आलं आहे.

मुंबई क्राइम ब्रांचने दहिसर चेक नाक्याजवळ (Dahisar checkpoint) मोठी कारवाई करत 24 किलो चरस जप्त केलं (24 KG Charas seized) आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 जणांना अटक (4 arrested with 24 Kg of charas) देखील केली आहे. संबंधित आरोपी राजस्थानातून रस्त्याच्या मार्गाने चरस मुंबईला घेऊन येत होते. गेल्या महिनाभरापासून दहिसर चेक नाक्याजवळ सापळा रचून बसल्यानंतर, पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या 24 किलो चरसची बाजारातील किंमत तब्बल 14 कोटी 44 लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-मुंबईत पुन्हा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटींच्या हिरोइनसह महिला तस्करला अटक

चरस तस्करी प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन पुरूष आणि दोन महिलांचा समावेश आहे. अटक केलेले सर्व आरोपी पवई परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी देखील राजस्थानातून रस्त्याच्या मार्गाने मुंबईत चरस आणला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. चारही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.

हेही वाचा-बापरे! सुपारी समजून अडकित्त्याने फोडला गावठी बॉम्ब; महिलेची झाली भयंकर अवस्था

गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. क्राइम ब्रांचची टीम गेल्या एक महिन्यापासून दहिसर येथील चेक नाक्यांवर सापळा रचून तस्करांची वाट पाहात होते. अखेर एक महिन्यानंतर, चरस तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. या कारवाईबाबत अधिक माहिती देण्यासाठी क्राइम ब्रांचचे डीसीपी दत्ता नलावडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Mumbai, Smuggling