जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बापरे! सुपारी समजून अडकित्त्याने फोडला गावठी बॉम्ब; महिलेची झाली भयंकर अवस्था

बापरे! सुपारी समजून अडकित्त्याने फोडला गावठी बॉम्ब; महिलेची झाली भयंकर अवस्था

लक्ष्मी सखाराम देवळी असं संबंधित 60 वर्षीय जखमी महिलेचं नाव  आहे. (Photo-Amazon)

लक्ष्मी सखाराम देवळी असं संबंधित 60 वर्षीय जखमी महिलेचं नाव आहे. (Photo-Amazon)

सावंतवाडीतील एका महिलेनं सुपारी (betel nut) समजून अडकित्याने चक्क गावठी बॉम्ब फोडला (woman blast desi bomb with nut-cracker) आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सावंतवाडी, 25 ऑक्टोबर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं सुपारी (betel nut) समजून अडकित्याने चक्क गावठी बॉम्ब फोडला (woman blast desi bomb with nut-cracker) आहे. गावठी बॉम्ब अडकित्याने फोडल्यामुळे संबंधित महिलेची भंयकर अवस्था झाली आहे. या घटनेच 60 वर्षीय महिलेचं एक बोट पूर्णपणे तुटलं असून तसेच तिच्या हाताला देखील मोठी दुखापत (Woman badly injured) झाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं संबंधित 60 वर्षीय जखमी महिलेचं नाव  आहे. जखमी देवळी या सांवतवाडी नजीक असणाऱ्या ओटवणे या गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास लक्ष्मी देवळी यांनी सुपारी समजून गावठी बॉम्ब अडकित्त्याने फोडला आहे. गावठी बॉम्ब अडकित्याने दाबताच त्याचा मोठा विस्फोट घडला आहे. यामध्ये देवळी याच्या एका हाताचं बोट तुटलं आहे. तसेच हाताला देखील गंभीर दुखापत झाली आहे. हेही वाचा- हृदयद्रावक! जन्माआधीच बाळाचा मृत्यू; विषारी सापाच्या दंशाने गरोदर मातेचा मृत्यू सुदैवाने ही घटना घडताना, संबंधित महिलेच्या आसपास आणखी कोणी नव्हतं. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. गावठी बॉंम्बच्या विस्फोटानंतर, संबंधित महिला घाबरून गेली होती. या दुर्दैवी घटनेनंतर, घटनास्थळी धावत आलेल्या लोकांनी देवाळी यांनी तातडीने प्राथमिक उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हेही वाचा- 3 महिन्याच्या बहिणीचा गळा दाबून अल्पवयीन भावाने मृतदेह पिशवीत टाकून नदीत फेकला या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित प्रकार पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. या घटनेची नोंद पोलिसांनी करून घेतली असून नेमका प्रकार कसा घडला याबाबत चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात