मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"20 वर्ष झाले सेवेत घेत नाही, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या" मानसेवी डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

"20 वर्ष झाले सेवेत घेत नाही, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या" मानसेवी डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Mansevi Doctors letter to CM: राज्यातील मानसेवी डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

मुंबई, 8 जुलै : राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यांत काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Mansevi Medical Officers) चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून आत्महत्येची परवानगी मागितली (allow us to commit suicide) आहे. या पत्रात मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांचाही उल्लेख केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं, आदिवासी भागात उन्हा पावसाची पर्वा न करत रुग्णसेवा करणाऱ्या, भरारी पथकाच्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सरकारकडून गेली दोन दशके वेठबिगारासारखे राबवले जात आहे. या डॉक्टरांचे मानधन 24 हजारांवरुन थेट 40 हजार रुपये करण्याचा महत्वपूर्ण 16 सप्टेंबर 2020 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला होता. मात्र, आता 11 महिने उलटले असून अद्यापही निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये. यामुळे त्रस्त डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एकतर मानधनवाढ तात्काळ लागू करा अथवा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी केली आहे.

Eknath Khadse: ईडीकडून एकनाथ खडसेंची 9 तास चौकशी; वाचा काय घडलं ED कार्यालयात

भरारी पथकाच्या डॉक्टरांना वर्षानुवर्षे अवघ्या 24 हजार रुपये मानधनावर राबवले जाते. यातही आदिवासी विभागाकडून सहा हजार रुपये तर आरोग्य विभाग 18 हजार असे हे 24 हजार रुपये दिले जातात. अनेकदा हे मानधनही वेळेवर दिले जात नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोना काळातही आम्ही रुग्ण तपासणी आणि उपचारात मदत करत आहोत. या काळात सरकारने जे तात्पुरते डॉक्टर घेतले त्यांनाही 60 हजार रुपये मानधन दिले गेले. मात्र, तेव्हाही आमचा विचार झाला नाही. आरोग्य विभागात डॉक्टरांची हजारो पदे रिक्त आहेत. जवळपास दोन दशकाहून अधिक काळ आम्ही सेवेत असून आम्हाला आता कायम सेवेत घ्यावे आणि तोपर्यंत 40 हजार रुपये एकत्रित मानधन तात्काळ देण्यात यावे अशीही मागणी डॉक्टरांनी केली आहे.

First published:

Tags: Maharashtra, Uddhav thackeray