मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Eknath Khadse: ईडीकडून एकनाथ खडसेंची 9 तास चौकशी; वाचा काय घडलं ED कार्यालयात

Eknath Khadse: ईडीकडून एकनाथ खडसेंची 9 तास चौकशी; वाचा काय घडलं ED कार्यालयात

Eknath Khadse: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी समन्स बजावले होते. त्यानंतर आज एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी झाली.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 8 जुलै : भोसरी जमीन घोडाळा (Bhosari Land Scam) प्रकरणात एकनाथ खडसे यांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानंतर आज सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी (ED interrogates Eknath Khadse for 9 hours) झाली. ही चौकशी झाल्यावर एकनाथ खडसे यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

काय घडलं ईडी कार्यालयात?

एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया देत माहिती दिली, एकनाथ खडसे यांनी ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. सर्व कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत आणि उर्वरित कागदपत्रे 10 दिवसांत सबमिट करू. एकनाथ खडसे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलेले नाहीये मात्र, गरज पडल्यास एकनाथ खडसे पुन्हा चौकशीसाठी हजर होतील.

''कुछ तो होनेवाला है''; असा मॅसेज फिरतोय

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.

काय आहे भोसरी जमीन खरेदीप्रकरण ?

भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद

ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी

चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली

तीन कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी

पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद

स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले

पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं

रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप

ईडीकडून एकनाथ खडसेंची चौकशी

एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक

आज (8 जुलै 2021) एकनाथ खडसेंची ईडीकडून 9 तास चौकशी

First published:

Tags: ED, Eknath khadse