मुंबई, 07 मे: ‘माझी दोन लहान मुलं अपघातामध्ये गेली होती. तेव्हा मी पूर्णपणे खचलो होतो. पण मला त्यावेळी आनंद दिघे साहेबांनी (anand dighe ) आधार दिला. मला त्यांनी प्रचंड धीर दिला. त्यावेळी त्यांनी मला शिवसेनेसाठी काम करण्यासाठी तयार केले आणि आज मी जो कोही तुमच्यासमोर उभा आहे तो आनंद दिघे यांच्यामुळेच आहे’, असं सांगत शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आठवणींना उजाळा दिला. दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (dharmveer anand dighe movie) या सिनेमाचा ट्रेलर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाँच झाला. या सोहळ्याला बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता सलमान खान देखील हजर होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळ देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ( घरात भक्तीगीतांसाठी स्पीकर लावल्यावरून सुरू झाला वाद; मात्र, शेवट इतका भयानक ) 2 जून 2002 साली माझ्या आयुष्यात अत्यंत कटू असा प्रसंग आला होता. माझी दोन लहान मुलं दिपेश ( वय 11) आणि शुभदा (वय 7) हे दोघे गावी बोटिंग करण्यासाठी गेले होते, त्यावेळी अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी श्रीकांत फक्त 14 वर्षांचा होता. मुलांच्या मृत्यूमुळे मी खचलो होतो, काय करावे हे कळत नव्हतं. साहजिक कुटुंबाला वेळ देत होते. त्यावेळी आनंद दिघे हे घरी येऊन माझी आणि कुटुंबीयांची विचारपूस करायचे. दर दिवसआड ते घरी येत होते. त्यावेळी ते ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहिले होते, अशी आठवण शिंदेंनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितली. तसंच, त्यावेळी त्यांनी मला पुढे काय करायचे याबद्दल विचारणा केली. तेव्हा कुटुंबाची जबाबदारी असल्याचं सांगितलं. पण त्यावर त्यांनी तुझी समाजाला जास्त गरज आहे. तुझे कुटुंब इतकं छोटं नाही, मोठं कुटुंब आहे. तुला लोकांसाठी काम करायचे आहे. असं सांगतील. त्यानंतर दिघे साहेबांनी मला ठाणे पालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली. मी कामात व्यस्त राहावे असा त्यांचा हेतू होता, असंही शिंदे यांनी सांगितलं. ( आलिया गावात अजब वरात, ‘पोश्टर गर्ल’ स्टाईल नवरी पोहोचली नवरदेवाच्या दारात, VIDEO ) तसंच, मी नगरसेवक झालो त्यावेळीही त्यांनी मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या. कल्याण आणि मुरबाडमध्ये जाण्यास सांगितले. शिवसैनिकांनी अनेक कामं त्यांनी दिली होती. अवघड कामं सुद्धा मी सहज करायचे. त्यांनी माझ्या नेतृत्वगुणाला संधी दिली आणि आज त्यांच्यामुळेच मी इथं आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







