कल्याण, 11 मे: व्हॉट्सअॅप स्टेटसला व्हिडीओ अपलोड (Video upload on WhatsApp status) करून कल्याण मधील एका तरुणानं नदीपात्रात (Man jumped into river) उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मयूर रामा जाधव असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव असून त्यानं सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कल्याणमधील गांधारी पुलावरून उडी घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या मात्र रात्री उशीरा पर्यंत शोध घेऊनही मयूरचा काहीही थांगपत्ता (Dead body not found) लागला नाही. मयूरच्या अशा जाण्यानं त्याच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे. 18 वर्षीय मयूर हा कल्याण पश्चिमेतील बारावे या गावातील रहिवासी आहे. सोमवारी दुपारी तो घरातून आपली दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्यानं दुपारी चारच्या सुमारास आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एक व्हिडीओ अपलोड केला. ज्यामध्ये ‘दारू ही माणसाच्या जीवनातील बेकार गोष्ट असल्याचा संदेश देण्यात आला होता. यानंतर त्यानं कल्याण पडघा मार्गावरील गांधारी पुलाच्या ठिकाणी जाऊन नदी पात्रात उडी घेतली आहे. हे वाचा- खळबळजनक! भारतात पत्नीनं गळफास घेतल्यानंतर जर्मनीत पतीनं उचललं टोकाचं पाऊल या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मयूरचा शोध घ्यायला सुरुवात केली. सोमवारी रात्री उशीरापर्यंत मयूरचा शोध घेण्यात आला. नदी पात्रात सर्व ठिकाणी त्याच्या शोध घेण्यात आला पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. यानंतर रात्री उशीरा शोधमोहीम थांबवण्यात आली. मयूरचा मृतदेह नदीपात्रातून वाहून गेल्याची भीती अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे. तर त्याची दुचाकी रात्री उशीरा पर्यंत त्याच पुलावर बाजूला लावलेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.