मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भारतात पत्नीनं गळफास घेतल्यानंतर जर्मनीत पतीनं उचललं टोकाचं पाऊल, 4 महिन्याच्या संसाराला गालबोट

भारतात पत्नीनं गळफास घेतल्यानंतर जर्मनीत पतीनं उचललं टोकाचं पाऊल, 4 महिन्याच्या संसाराला गालबोट

लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच महिलेने गळफास लावून आत्महत्या (Suicide case Jabalpur) केली. या घटनेची माहिती तिच्या जर्मनीत राहणाऱ्या पतीला मिळताच त्यानेही आपले जीवन संपवले.

लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच महिलेने गळफास लावून आत्महत्या (Suicide case Jabalpur) केली. या घटनेची माहिती तिच्या जर्मनीत राहणाऱ्या पतीला मिळताच त्यानेही आपले जीवन संपवले.

लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच महिलेने गळफास लावून आत्महत्या (Suicide case Jabalpur) केली. या घटनेची माहिती तिच्या जर्मनीत राहणाऱ्या पतीला मिळताच त्यानेही आपले जीवन संपवले.

  • Published by:  News18 Desk
जबलपूर, 09 मे: गोरखपूर भागातील रामपूर परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यांत गळफास लावून आत्महत्या (Suicide case Jabalpur) केली. या घटनेची माहिती तिच्या जर्मनीत राहणाऱ्या पतीला मिळताच त्यानेही आपले जीवन संपवले. जर्मनी येथील पोलिसांनी गोरखपूर पोलिसांना महिलेचा पती सिमरन यांच्या आत्महत्येची माहिती दिली. तसेच, त्यांची खोली सीलबंद करण्यात आल्याचे सांगितले. त्यांचा मोबाईल आणि इतर साहित्य अद्याप तिथेच ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होशियारपूर पंजाब येथे राहणारी 28 वर्षीय महिला नवज्योतीचे 4 महिन्यांपूर्वी जबलपूरमधील गोरखपूर परिसरातील रहिवासी सिमरन मक्कर यांच्याशी लग्न झाले होते. सिमरन जर्मनीमध्ये अभियंता म्हणून नोकरीस होते. सिमरन यांचे वडील हरमिंदर सिंग, त्यांची आई आणि त्यांची एक बहीण येथे राहतात. सदरमध्ये हरमिंदरचे स्टेशनरी दुकान आहे. मुलगा आणि सून यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. हे वाचा - मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी जमली तोबा गर्दी; कोरोनाचे नियम पायदळी, पाहा VIDEO नवज्योतीचे वडील आणि भाऊ सैन्यात असून ते सध्या महू येथे तैनात आहेत. नवज्योती माहेराहून दहा दिवसांपूर्वीच सासरी परत आली होती. स्वतःच्या मुलाशी बोलल्यानंतर सासरे हरमिंदर नवज्योतीला समजावण्यासाठी तिच्या खोलीकडे गेले. मात्र, खोलीचा दरवाजा आतून बंद होता. दार वाजवल्यानंतरही बराच वेळी नवज्योतीने दरवाजा उघडला नाही. अनेक वेळा हाक मारूनही काही प्रतिसाद येत नसल्याने हरमिंदर यांनी खिडकीतून आत डोकावले. तेव्हा त्यांना नवज्योती साडीच्या फास बनवून पंख्याला लटकलेली दिसली. त्यांनी या घटनेची माहिती मुलाला दिली. यानंतर मुलाने आपला एक मित्र कुलदीपला तेथे पाठवले. त्यानंतर नवज्योतीला खाली उतरवले गेले आणि तातडीने रुग्णालयात नेले गेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे वाचा - 15 दिवस कोरोना रुग्ण जिवंत असल्याचं डॉक्टरांनीच भासवलं, घटनेचं कारण समोर आल्यावर हादरले कुटुंबीय आईनेही बराच वेळ समजावले कुठल्या तरी कारणाने त्रस्त असलेल्या नवज्योतीने 6 मेच्या रात्री होशियारपूर येथे राहणाऱ्या तिच्या आईशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी आपल्या मुलीचे निराशाजनक बोलणे ऐकून तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, यानंतर तिने आईचा फोन उचलणेदेखील थांबवले. त्यानंतर तिच्या आईने त्यांचा जावई सिमरन यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर सिमरन यांनी वडील हरमिंदर सिंग यांना फोन करून नवज्योतीला समजावण्यास सांगितले.
First published:

Tags: Crime news, Husband suicide, Madhya pradesh, Suicide news

पुढील बातम्या