गुजरात, 10 फेब्रुवारी : 1993मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी (Mumbai Blast Case) तपास यंत्रणेला मोठे यश आले आहे. गुजरात ATSने दहशतवादी मुनाफ हलारी मूसा याला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. मुनाफ हलारी यांना गुजरात अँटी टेररिझम स्कॉडने अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो पाकिस्तानच्या पासपोर्टवर प्रवास करत होते. 1993मध्ये मुनाफ हलारीने झवेरी बाजारात स्फोट करवला होता. तपास संस्था बर्याच दिवसांपासून याचा शोध घेत होती.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार मुनाफ हलारी हा महाराष्ट्रातील आहे. मुंबई बॉम्बस्फोटासाठी त्याने तीन स्कूटर दिले होते असे सांगितले जात आहे. झवेरी बाजारात स्कूटरचा स्फोट झाला. मुंबईतील निगम क्रॉस रोड आणि दादर येथे हे दोन्ही स्कूटर सापडले.
वाचा-हिंगणघाटमध्ये मृत पीडितांच्या नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन, लेखी आश्वासन द्या तरच.
Gujarat Anti-Terrorism Squad (ATS): Munaf Halari Moosa arrested by ATS from Mumbai Airport, he was involved in drug trafficking worth Rs 1,500 crores, which was busted last year. He is also an accused in 1993 Mumbai bomb blasts.
— ANI (@ANI) February 10, 2020
वाचा-पुण्यात छपाक? अॅसिड हल्ल्याची धमकी देऊन पुण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार
27 वर्षांपूर्वी हादरली होती मुंबई
12 मार्च 1993 रोजी मुंबईत अवघ्या दोन तासांतच 12 वेगवेगळ्या ठिकाणी 12 स्फोट झाले हे ऐकून मुंबई हादरली. या स्फोटांमध्ये 257 लोक ठार झाले, तर असंख्य लोक जखमी झाले. 19 नोव्हेंबर 1993 रोजी हा खटला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आला. या खटल्याची सुनावणी 19 एप्रिल 1995 रोजी मुंबईच्या टाडा कोर्टात सुरू झाली. पुढील दोन महिन्यांत आरोपींविरोधात आरोप निश्चित केले गेले. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला यापूर्वीच फाशी देण्यात आली आहे. मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम अद्याप पोलीस कोठडीबाहेर आहे.